Nalasopra Latest Crime News : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने ‘मीरा-भाईंदर गुन्हे शाखेची’ मोठी कारवाई; 8 गंभीर गुन्ह्यांमध्ये होता फरार
नालासोपारा | दरोडा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हे दाखल असलेला, गेल्या सहा वर्षांपासून फरार असलेला कुख्यात गुन्हेगार कुकण ऊर्फ कृष्णा काळुराम शिंदे (40 वय) याला जेरबंद करण्यात मीरा-भाईंदर, वसई-विरार गुन्हे प्रकटीकरण शाखा (कक्ष 4) ला मोठे यश आले आहे. नालासोपारा पूर्वेतील धानिवबाग परिसरात तो लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. Nalasopra Latest Crime News
ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीच्या बहाण्याने 2.5 लाखांचा दरोडा
सदर कारवाईची पार्श्वभूमी सोलापूर जिल्ह्यातील आहे. 26 जून 2021 रोजी सोलापूरच्या कुडूवाडी (ता. माढा) येथील साकेत मंगल कार्यालयाजवळ ट्रॅक्टरची ट्रॉली खरेदी करण्याचा बनाव रचून फिर्यादीला बोलावण्यात आले होते. यावेळी आरोपी कृष्णा शिंदे याने एका महिला आणि चार पुरुष साथीदारांच्या मदतीने फिर्यादीला बेदम मारहाण करत त्यांच्याकडील 2 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने लुटली होती. याप्रकरणी सोलापूर ग्रामीणच्या कुडूवाडी पोलीस ठाण्यात दरोडा आणि मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असा लागला छडा
मुख्य आरोपी कृष्णा शिंदे हा मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात लपला असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने कक्ष-4 ला दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय खबऱ्यांमार्फत शोध सुरू केला. तो नालासोपाऱ्यातील धानिवबाग भागात वास्तव्यास असल्याची खात्री पटताच, 14 फेब्रुवारी 2026 रोजी पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या.
एकापाठोपाठ 8 गुन्ह्यांचा उलगडा
प्राथमिक चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून, हा आरोपी केवळ या एकाच नव्हे, तर एकूण 8 गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता. तो अनेक वर्षांपासून पोलिसांना चकवा देऊन आपले वास्तव्य बदलत होता. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-4 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…