Nalasopra Crime News : घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक; तळींज पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाले यश

Nalasopra Tulij Police Arrested Criminal : घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक 4 गुन्ह्यांची उकल, चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत

नालासोपारा :- घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात तुळींज पोलिसांच्या गुन्हे शाखेल Nalasopra Tulij Crime Beanch यश मिळाले आहे. आरोपींवर यापूर्वीचे चार गुन्हे दाखल असून तपास व चौकशीसाठी तुळींज पोलिसांच्या ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आरोपीने चोरी केलेल्या मुद्देमाल ही पोलिसांनी हस्तगत केल्याचे सांगण्यात आले आहे.

नालासोपारा येथे शिवपूजा अपार्टमेंट प्रगती नगर येथे राहणाऱ्या यासीन यासिन हाबीद विश्वास ( वय 25) याच्या घरी 6 मे च्या दरम्यान बाथरूमची खिडकीची काच व ग्रील तोडून चोरट्यांनी प्रवेश करून चोरी केल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आदेश दिले होते.सूचना व आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पोलीस अधिकारी व अंमलदारांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देवून गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयीत आरोपी निष्पन्न केले. तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या बातमीवरून सुनीलकुमार अखिलेश राय ( रा. नालासोपारा) ताब्यात घेतले आहे. आरोपीची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असल्याचे तपासा उघडकीस आले आहे.

पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले / श्रींगी पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-2 वसई, उमेश माने पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, आशपाक जमादार, इस्माईल छपरीबन,राहुल कदम, पोलीस शिपाई शशिकांत पोटे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

vivek

Recent Posts