Nalasopra Crime Branch : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा आणि गुन्हे शाखेची धडक कारवाई, 742 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत
Nalasopra Crime Branch Arrested Illegal Drug Supplier : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नालासोपारा पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांच्या पथकाने 72 वर्षीय अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले आहे
नालासोपारा :- मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस Mira Bhayandar Vasai Virar Police आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ खरेदी विक्री Illegal Drug Selling In Nalasopra करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक सौरभ पवार आणि पथक यांनी परिमंडळ 2 आणि 3 येथे पेट्रोलिंग करीत असताना एका टपरीवर संशयित 72 वर्षीय महिला ही अंमली पदार्थ म्हणजेच गांजा याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात Virar Police Staion एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नालासोपारा यांच्या पोलीस निरीक्षक सौरभ पवार आणि त्यांचे पोलीस पथक परिमंडळ 2 आणि 3 येथे पेट्रोलिंग करीत असताना नारंगी फाटा ,विरार पूर्व येथे एक व्यक्ती संशयितरित्या त्यांच्या खाऊच्या टपरीवर वावरत असताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी पंचासमक्ष झडती घेतली असता त्या टपरीवर पोलिसांना 742 ग्रॅम वजनाचे गांजा ज्याची किंमत अठरा हजार पाचशे रुपये किमतीचा गांजा आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी जानकी बलई यादव (72 वय रा. विरार पूर्व मुळ रा. उत्तर प्रदेश) या महिलेला पोलिसांनी गांजा विक्री प्रकरणी ताब्यात घेतले आहे. तिच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ (गुन्हे शाखा), यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, तसेच सहाय्यक फौजदार उमेश गवई, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, पोलीस हवालदार महेंद्र शेटये, सुनिल पागी, सर्व अन.मा.वा. प्र. कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे.