Uncategorized

Nalasopra Builder Scam : फरार बिल्डर चार वर्षानंतर गजाआड ; घर देतो असे सांगून 43 लोकांची 9.50 कोटींची फसवणूक

Virar Crime Branch Arrested Thuggest Builder: विरार गुन्हे कक्ष शाखा 3 यांची यशस्वी कामगिरी चार वर्षापासून फरार असलेला पृथ्वी डेव्हलपर्स भागीदार ब्रिजेश मौर्या याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नालासोपारा :- इमारत विकसित Nalasopara Building Development करून त्या बदल्यात घर देतो असे सांगून तब्बल 43 लोकांची फसवणूक करणाऱ्या ब्रिजेश मौर्या Nalasopra Builder Brijesh Morya या विकासकाला अटक केली आहे. आरोपी मागील चार वर्षांपासून फरार होता. विरार‌ गुन्हे शाखेच्या कक्ष-3 पोलिसांनी Virar Crime Branch Arrested Builder फरार बिल्डरला बेड्या ठोकल्या आहे. जवळपास त्यांने 9.50 कोटी रुपयाचे फसवणूक केली आहे. Nalasopra Latest Crime News

ड्रीम निर्माण आणि पृथ्वी डेव्हलपर्स यांनी भागीदारी करत एक प्रकल्प विकसित करण्याचे आश्वासन दिले. घर घेण्यासाठी गुंतवलेल्या 43 लोकांनी चेक आणि रोख रक्कम असा एकूण 9.50 कोटी रुपये या विकासाकांना दिले होते. परंतु घर ताब्यात न देता फसवणूक केली होती. या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात भा.द.वी.से कलम 420,34सह मोफा अधिनीयम कलम 3,4 व 13 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबधांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 चे कलम 3,4प्रमाणे गुन्हा नोंद असून गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. ड्रीम निर्माण बिल्डिगचा मालक चांद हनीफ शेख, तर पृथ्वी डेव्हलपर्सचे भागीदार चंद्रकांत पटेल, पवन तिवारी, मुन्ना शर्मा, ब्रिजेश मौर्या यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आले होत्या. Nalasopra Latest Crime News

पोलीस उप आयुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालयातील गंभीर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे बाबत दिलेल्या सुचना व आदेशान्वये गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष 3 व्दारे करीत असतांना गुन्हयातील आरोपी यास तांत्रीक विश्लेषण व प्राप्त गोपनीय बातमीवरुन आरोपी ब्रिजेश विद्याप्रसाद मोर्या, (रा. अल्कापुरी, आचोळे रोड, नालासोपारा पूर्व,) यास ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा भा.द.वी. से कलम 430,34 सह मोफा अधिनीयम कलम 3,4 व 13 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबधांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 चे कलम 3, 4 प्रमाणे या गुन्हयात आर्थिक गुन्हे शाखा येथे हजर करण्यात आले असून त्यास 26 ऑगस्ट 2024 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर आहे. आरोपीच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. Nalasopra Latest Crime News

पोलीस पथक
मधुकर पांण्डेय, पोलीस आयुक्त,दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, ज्ञानेश्वर आव्हाड, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष 3 तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सायबर सेल यांनी पार पाडली आहे. Nalasopra Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0