नालासोपारा : महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणारा महिला आरोपी अटकेत

Nalasopra Sex Scandal Busted : पैशांचे आमिष दाखवत महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका महिला आरोपीला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पोलिसांनी अटक केली असून दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे
नालासोपारा :- पैशांचे आमिष दाखवत महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका महिला आरोपीला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेच्या पोलिसांनी अटक केली. Nalasopra Sex Scandal Busted आरोपी महिलेला अटक करतानाच पोलिसांनी Nalasopra Police News दोन महिलांची सुटका केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तुळींज पोलीस ठाणे Tulij Police Station हद्दीतील संतोष भुचन, पेल्हार रोड, नालासोपारा पूर्व परिसरात रेशमा पंडित बोरसे (31वय) काही महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सौरभ पवार यांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने आरोपीची खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी त्या महिला आरोपीला म्हणजे रेश्मा बोरसे यांना 03 मार्च रोजी सोमवारी छापा टाकून पंचा समक्ष अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली आणि दोन्ही महिलांची सुटका केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. महिलेच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 143(2) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, सहाय्यक फौजदार गवई, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, पोलीस हवालदार रोशन किणी, महेंद्र शेट्ये, अमित चव्हाण, महिला पोलीस हवालदार तिवले, पोलीस हवालदार श्याम शिंदे, सुनिल पागी, सर्व नेमणुक अनैतिक मानची वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.