क्राईम न्यूजमुंबई
Trending

Nalasopara Tadipar News : नालासोपारात हैदोस घालणाऱ्या तडीपार गुंडाला मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून जेरबंद!

Nalasopara Tadipar News : आरोपीला दोन वर्षाकरिता पाच जिल्ह्यातून केले होते तडीपार, मनाई आदेश भंग प्रकरणी पोलिसांकडून अटक

नालासोपारा :- नालासोपारा एका सराईत गुन्हेगाराने हैदोस घातला होता. चोरी, हाणामारी, प्राणघात हल्ला अशा गुन्ह्यांमध्ये 2016 पासून शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला पोलिसांनी दोन वर्षाकरिता 2023 मध्ये तडीपार केली होती. परंतु आपला कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच या तडीपार आरोपीने Nalasopara Tadipar Criminal पुन्हा नालासोपाऱ्यात वावरत होता. मनाई आदेश भंग केल्याप्रकरणी, पोलिसांनी सराईत गुन्हेगार मोहम्मद करीम शकील शेख (31 वय, रा.नालासोपारा) याला अटक करण्यात आली आहे. Nalasopara Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अटक होवूनही त्याचे गुन्हेगारी वृत्तीत बदल झालेला नसून त्याचे समाज विघटीत कृत्यामुळे समाजचे व आजुबाजुच्या परीसरात राहणाऱ्या नागरीकांच्या जिवीतास तसेच मालमत्तेस धोका नाकारता येणार नाही. याकरीता पोलीस उप आयुक्त, मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय, परीमंडळ-2 यांनी 23 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 5,6, (1), (अ), (ब) प्रमाणे मोहम्मद करीम शकील शेख, (31 वय) यास ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, नाशीक जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगरे वा कार्यक्षेत्रातुन दोन वर्षाकरीता तहीपार करण्यात आलेले होते. Nalasopara Crime News

पोलीस हवालदार राजाराम मधुकर काळे, संतोष मदने, अकिल सुतार असे गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग फिरत असतांना आचोळे पोलीस ठाण्याचे हद्दीतील राजनगर सर्कल परिसरात आले असता दुपारच्या सुमारास राजनगर सर्कल येथुन रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या सार्वजनीक रोडवर एक व्यक्ती उभा असलेला दिसला त्यास पोलीस हवालदार राजाराम काळे यांनी ओळखले. दोन वर्षाकरीता तडिपार करण्यात आले असतांना देखील नमुद आरोपी हा वरीष्ठांनी दिलेल्या तडीपार आदेशाचा भंग करुन त्यास मनाई असलेल्या पालघर जिल्हातील नालासोपारा पूर्व परीसरात मिळून आल्याने त्याचे विरुध्द तुळींज पोलीस ठाण्यात Tuilj Police Station महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आलेली आहे. Nalasopara Crime News

Avinash-Ambure

पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अधिनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक, धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नितीन बेन्द्रे, दत्तात्रय सरक, पोलीस उपनिरीक्षक. हितेंन्द्र विचारे, सहाय्यक फौजदार, श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोलीस हवालदार राजाराम काळे, संतोष गदने, अनिल नांगरे, प्रविण पवार, राजविर संधु, हनुमंत सुर्यवंशी, संग्राम गायकवाड, सतिष जगताप, महेश पेल्हे, शिवाजी पाटील, गोविद केंद्रे, पोलीस शिपाई अंकीत सुतार, नितीन राठोड, साकेत गाघाडे, अंगद मुळे, मसुब सचिन चौधरी सर्व नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0