•नालासोपाऱ्यात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ‘मंथन फॅमिली रेस्टॉरंट’ ठरलं अनैतिक व्यवहाराचं केंद्र
नालासोपारा :- नालासोपाऱ्यातील मंथन फॅमिली रेस्टॉरंट अॅण्ड बार या ठिकाणी चालणाऱ्या अनैतिक वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश करत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने दोन महिला दलालांना अटक केली. या कारवाईत तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली असून, गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
17 मे रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. आरोपी महिला माधवी महादेव खाडे (68 वय) आणि सुवर्णा शंकर पोळ (40 वय) या मोबाईलवरून ग्राहकांशी संपर्क साधून पैशाच्या मोबदल्यात मुली पुरवत असल्याचे निष्पन्न झाले.
मंथन रेस्टॉरंटमध्ये सौदेबाजी सुरू असतानाच, पोलिसांनी छापा टाकून दोघींनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. त्या पिडीत महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत होत्या, हे तपासात स्पष्ट झाले.या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात 143(3) आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी या कारवाईत दाखवलेली तत्परता आणि सजगता प्रशंसनीय ठरत असून, आणखी कोणी या रॅकेटमागे आहे का, याचा तपास सुरू आहे.
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे),मदन बल्लाळ सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, सहाय्यक फौजदार उमेश गवई, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, पोलीस हवालदार रोशन किणी, पोलीस हवालदार महेंद्र शेट्ये, महिला पोलीस हवालदार सुप्रिया तिवले, पोलीस हवालदार सुनिल पागी, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्टरित्या केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…