क्राईम न्यूजमुंबई

Nalasopara Police News : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर घरफोडी, चोरी आणि फसवणूक यांमधील मुद्देमाल नागरिकांना परत

Nalasopara Police Diwali Gift : नालासोपारा पोलिसांची कामगिरी सहा गुन्ह्यातील 39 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना पोलिसांनी परत दिला

नालासोपारा :- नालासोपारा पोलीस ठाण्याच्या Nalasopara Police Station हद्दीतील एकूण सहा गुन्ह्यातील तक्रारीला पोलिसांनी अखेर न्याय दिला आहे. Nalasopara Police Diwali Gift पोलिसांनी नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण सहा गुन्ह्यातील दाखल असलेल्या चोरी, घरफोडी आणि फसवणुकीत एकूण 39 लाख 15 हजार 282 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपीकडून जप्त करून नागरिकांना परत दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नालासोपारा पोलीस ठाणे येथे एकुण 06 गुन्हयातील दाखल असलेल्या घरफोडी, चोरी तसेच फसवणुकीच्या गुन्हयातील आरोपी यांचेकडुन हस्तगत करण्यात आलेले रोख रक्कम रुपये 5 लाख 5 हजार 408 एक लाख रुपये कि.ची मोटारसायकल, मोबाईल फोन तसेच 28 लाख 23 हजार 540 रुपये कि.चे सोन्याचे दागिने असे एकुण 39 लाख 15 हजार 282 रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल नागरीकांना परत करुन दिवाळीची अनोखी भेट पोलीसांनी दिलेली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या शुभमुहर्तावर सामान्य नागरीकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

पोलीस पथक

पोलीस उप आयुक्त परीमंडळ 03 विरार जयंत बजबळे , सहाय्यक पोलीस आयुक्त नालासोपारा विभाग विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम, पोलीस निरीक्षक (गुन्हे)सचिन कोतमिरे, व पोलीस निरीक्षक श्री श्याम आपेट, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चंदनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडीत मस्के (सध्या वालीच पोस्टे), पोलीस निरीक्षक अमोल तळेकर (सध्या नवघर पोस्टे) पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, अख्तर शेख, सहाय्यक पोलीस अंमलदार निकुंभ, पोलीस हवालदार धनु, साळुंखे, पोलीस नाईक तटकरे, पोलीस शिपाई गलांडे, बाचकर, नाडुलकर, घोडेराव, जगदाळे, पोलीस हवालदार ढोणे पोलीस शिपाई सोहेल शेख (पो.उपा. कार्यालय परीमंडळ ०३ विरार) यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0