Nalasopara Murder Mystery: सन 2013 ची घटना ; क्रूरपणे हत्या करून मृतदेहाला जाळण्याचा प्रयत्न..
Nalasopara Murder Mystery Solve Crime Branch मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण पोलिसांची कामगिरी : बारा वर्षानंतर आरोपीला उत्तर प्रदेश येथून अटक
नालासोपारा :- 1 जानेवारी 2013 मध्यरात्री पूर्ववैमान्यातून भांडण होऊन आरोपींनी नालासोपारा येथील गावदेवी शाळेत राहणाऱ्या महेश कुमार राम चंद (44, वर्ष) याची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या भांडणात महेश कुमार यांच्या डोक्यावर फावड्याने मारहाण करून दोरीने त्यांच्या गळा आवळून जीवे ठार मारले आणि त्यानंतर त्याला दुकानातच जाळून पुरावे नष्ट करण्यात आल्याचा प्रयत्न नालासोपारा येथे झाला होता. परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी 2 जानेवारी 2023 रोजी दोन आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये पहिला आरोपी अमीर अब्बास मोईद्दीन शेख आणि दुसरा आरोपी मोहमंद नईम बन्नेमिया अन्सारी या दोन आरोपींना अटक करून दोषारोप करण्यात आले होते. परंतु मुख्य आरोपी हिरा उर्फ खुर्शीद आलम मोहम्मद हनीफ अन्सारी हा ज्या दिवसापासून गुन्हा Crime घडला आहे त्या दिवसापासून तो फरार होता.
आरोपीला उत्तर प्रदेश मधून अटक, सिने स्टाईलने पोलिसांनी आरोपीवर ठेवली पाळत..
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर आणि संवेदनशील पुण्यातील मुख्य आरोपींचा शोध घेण्यास सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पुण्यातील मुख्य आरोपी असलेले हिरा उर्फ खुर्शीद आलम मोहम्मद हनीफ अन्सारी याचा सर्वोत्तरी पोलीस कडून गेल्या बारा वर्षापासून शोध घेतला जात होता. मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक पोलीस हवालदार शिवाजी पाटील, गोविंदा केंद्रे असे पथक तयार करून पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे अन्सारी याचा भाऊ दिल्ली येथे लेडीज पर्स बनवण्याचे काम करतो अशी माहिती प्राप्त झाली होती. पोलीस आली एक पथक तयार करून दिल्ली येथे अन्सारी याचा भाऊ याच्याबद्दल माहिती गोळा केली, पोलिसांना आरोपी हा मोबाईल वापरत नसल्याचे माहिती मिळाली तसेच त्याच्या संपर्कात कोणच नसल्याबाबत पोलिसांना खत्रीला एक माहिती मिळाली होती. सलग दोन महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करून सातत्य ठेवून आरोपीची गोपनीय माहिती काढली असता आरोपी हा राहते गावापासून लांब शेतात एकटाच राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताञय सरक, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, गोविंद केन्द्र असे सहसवान, उत्तरप्रदेश येथे जावून तेथील स्थानिक पोलीसांचे मदतीने सतत 10 दिवस शेतावर पाळत ठेवुन सापळा लावला असताना आरोपी पळून जात असताना आरोपी हिरा ऊर्फ खुर्शीद आलम मोहम्मद हनीफ अन्सारी, (39 वर्ष) (रा. मोहल्ला कटरा, शहबाजपुर कस्बा, थाना सहसवान, जनपद बदायु, उत्तरप्रदेश) 24 जुन रोजी 1.30 वाजता सुमारास मोठ्या शिताफिने ताब्यात घेण्यात आलेले आहे. Nalasopara Murder Mystery
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनांजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेन्द्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेंन्द्र विचारे, सहाय्यक पोलीस फौजदार श्रीमंत जेधे, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, गोविंद केद्रे, संतोष मदने, हनुमंत सुर्यवंशी, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, राजविर संधु, प्रविणराज पवार, सतिष जगताप, राजाराम काळे, महेश वेल्हे, संग्राम गायकवाड, अनिल नागरे, सतिष जगताप, अखिल सुतार, नितीन राठोड, साकेत माघाडे, अंगद मुळे, सचीन चौधरी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. Nalasopara Murder Mystery