क्राईम न्यूजमुंबई

Nalasopara Illegal Migrant : नालासोपारा मध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या दोन बांग्लादेशीय नागरिकांना पोलिसांनी केले अटक

Nalasopara Police Arrested Illegal Migrant : वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहणाऱ्या दोन बांग्लादेशीय नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांनी नालासोपारातून अटक केली.

नालासोपारा :- बांग्लादेशीय नागरिकांचे बेकायदेशीर Illegal Bangladeshi Migrant रित्या भारतामध्ये वास्तव्य करण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांकडून Nala Sopara Police अनेक वेळा अवैध मार्गाने भारतात येणाऱ्या बांगलादेशीय नागरिकांना अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नालासोपारा यांनी नालासोपाराच्या निळेगाव परिसरात राहणाऱ्या दोन बांग्लादेशीय नागरिकांना अटक केली आहे. अटक आरोपींकडून कोणत्याही प्रकारे अवैध कागदपत्र नसल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात घुसखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. Nalasopara Crime News

नालासोपाराच्या निळेगाव परिसरातून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निळेगाव, नालासोपारा या परिसरात दोन बांगलादेशीय नागरिक बेकायदेशीर रित्या राहत असल्याचे खात्रीदायक माहिती मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पंच व पथक तयार करून निळेगाव येथे छापा टाकला असता त्यांना दोन संशयित नागरिक आढळून आले. त्यांना नाव पत्ता व भारतीय नागरिकत्वाचे कागदपत्रे विचारले असता त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नसून ते अनाधिकृतपणे भारतात प्रवेश करून अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचे कबुली पोलिसांना दिलेली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय पासपोर्ट अधिनियम 1950 चे कलम 3(अ),6 (अ), सह विदेशी अधिनियमन 1946 चे कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच अटक आरोपींची नावे हन्नन यासीन शेख ,शमीम मंडन शेख, असे अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशीय नागरिकांचे नावे असून ते अजमेरी चिकन सेंटर मध्ये काम करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. हे मूळचे बांगलादेश मध्ये राहणारे असून ते नालासोपारा येथील निळेगाव परिसरात राहत होते. पोलिसांनी आरोपींवर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर पुढील कारवाई केली जात आहे. Nalasopara Crime News

Avinash-Ambure

पोलीस पथक

पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, सहाय्यक फौजदार गवई, पोलीस हवालदार किणी, शेट्ये, शिंदे, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, तिवले, महिला पोलीस शिपाई पाटील सर्व नेम.अनै.मा.वा. प्र. कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे. Nalasopara Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0