Nalasopara Drug News : नालासोपाऱ्यात ब्राऊन शुगर, टॅब्लेटचा मोठा साठा जप्त! – ‘धानिव बाग’ परिसरात अंमली पदार्थ विरोधी कक्षाचा छापा

Nalasopara Drug Busted News : 6.23 लाखांचे अंमली पदार्थ हस्तगत; आरोपी सलीम सरदार बा सराईत गुन्हेगार, त्याच्यावर 12 गुन्हे दाखल; पुढील तपास पेल्हार पोलीस ठाण्याकडे
नालासोपारा :- वसई-विरार परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) मोठी कारवाई केली आहे. नालासोपारा पूर्व येथील धानिव बाग परिसरात छापा टाकून पोलिसांनी सुमारे 6 लाख 23 हजार 628 रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर (Brown Sugar) आणि Nitrazepam Tablets जप्त केले आहेत. Nalasopara Drug News
दिनांक 4 डिसेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष-2 (नालासोपारा) च्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. पोलीस हवालदार सुधीर नरळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, हरवटे पाडा, तबेल्याजवळ, धानिव बाग येथे छापा टाकण्यात आला.
या छाप्यात पोलिसांनी आरोपी सलीम बाबुमियाँ सरदार बा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ब्राऊन शुगर आणि Nitrazepam Tablets असे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
सराईत आरोपी
आरोपी सलीम बाबुमियाँ सरदार बा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी एन.डी.पी.एस. कायद्यान्वये तीन आणि इतर नऊ असे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष-2 च्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पेल्हार पोलीस ठाणे करत आहे.


