Nalasopara Cyber Crime News : सायबर पोलिसांची कामगिरी महिलेचे फसवणुकीतील रक्कम परत मिळून देण्यास यश, 4.10 लाखांचा घातला होता गंडा
नालासोपारा :- INEFEX या Investment ॲप शेअर्स मार्केटची खरेदी-विक्री केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून महिलेची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. Nalasopara Cyber Fraud News महिलेने सायबर पोलिसांना तक्रार दिल्याने पोलिसांनी फसवणुकीतील 4 लाख 10 हजार 235 रुपयांची रक्कम परत मिळून देण्यास पोलिसांना यश आले आहे. Nalasopara Cyber Crime Latest News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील काशिमिरा पोलीस ठाण्याच्या Kashmira Police Station हद्दीत राहणाऱ्या खोसे (महिला) यांनी ऑनलाइन शेअर ट्रेडिंग करून अधिक रक्कम मिळत असल्याने INEFEX या investment रकमेची गुंतवणूक केली. परंतु महिलेला कोणताही परतावा मिळाला नाही. त्यावर तक्रारदार यांना सायबर पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज दाखल केले. महिलेच्या तक्रारीवरून ऑनलाईन NCCRP PORTAL वर तक्रार दाखल करण्यात आली होती. सायबर पोलिसांनी तक्रारीच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे महिलेने आर्थिक व्यवहार केलेल्या खात्याची पाहणी तपासणी केली असता त्याची रक्कम थांबवण्यात आली होती. रक्कम न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून महिलेच्या मूळ खात्यावर आणून देण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी महिलेने गुंतवणुकीमध्ये घालवलेले चार लाख दहा हजार 235 रुपये परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे. Nalasopara Cyber Crime Latest News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, पोलीस अंमलदार विलास खाटीक, राहुल बन सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे. Nalasopara Cyber Crime Latest News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…