मुंबई

Nalasopara Crime News : काशिगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक

•न्यु सालासर ऑर्चीड टॉवरच्या परिसरात वास्तव्याला असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांना यश आले.

नालासोपारा :- काशिगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यु सालासर ऑर्चीड टॉवरच्या परिसरात वास्तव्याला असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांना यश आले आहे. बांगलादेशी नागरिकांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे.या दोन्ही आरोपी हे पुरुष असून ते अनेक वर्षांपासून भारतात वास्तव्याला आहे. कामाच्या शोधात त्या बांगलादेशातून भारतात पळून आल्या होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा मीरा-भाईंदर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, काशिगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या न्यु सालासर ऑर्चीड टॉवरचे लगत असलेल्या पानगादी जवळ काशिमीरा या ठिकाणी बांगलादेशी नागरीक असल्याची बातमी मिळाली होती तसेच विनापरवाना राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना पंचासमक्ष ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली असता आरोपी हे बांगलादेशी असल्याचे कबूल केले आहे. या दोन्ही आरोपींच्या विरोधात काशिगांव पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई केशव निवृत्ती शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपींच्या विरोधात परकीय नागरिक कायदा, पारपत्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथक

अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे),मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष मिरा-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे, सहाय्यक फौजदार उमेश पाटील, रामचंद्र पाटील,शिवाजी पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस शिपाई चेतनसिंग राजपुत, केशव शिंदे, महिला पोलीस शिपाई अश्विनी भिलारे, सम्राट गावडे सर्व नेमणूक-अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर यांनी केली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

43 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago