Uncategorized
Trending

Nalasopara Crime News : मोबाईल टॉवरवर‌ रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी लावण्यात येणारी मशीन आणि AZNA कार्ड (RR UNIT) चोरी करणाऱ्या टोळीचे नेटवर्क पोलीसांनी केले उद्ध्वस्त!

A machine installed on a mobile tower for radio frequency Stolen By Robbers : गुन्हे शाखा कक्ष-3 विरार यांची कामगिरी ; आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात मोबाईल टॉवरवर रेडिओ फ्रिक्वेन्सी साठी लावण्यात येणारे मशीन हॉंगकॉंग आणि चीन या देशाला विक्री करणाऱ्या एका टोळीचा पोलीसांनी उध्वस्त केले नेटवर्क

नालासोपारा :- मोबाईल टॉवरवरील रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी mobile tower for radio frequency लावण्यात आलेल्या मशीन/AZNA कार्ड (RR UNIT) चोरी करणाऱ्या टोळीचा विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-3 Virar Police Crime Branch Cell-3 , नेटवर्क उध्वस्त केले आहे. या International Smuggling आंतरराष्ट्रीय टोळीने हाँगकाँग आणि चीन येथे चोरलेल्या मशीनी पाठवून पुनर्व दुरुस्ती करून पुन्हा भारतीय बाजारात आणण्याचा काळाबाजार या टोळींकडून केला जात होता. Nalasopara Crime News

पाचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेन अव्हेन्यु अपार्टमेंट, मदर मेरी शाळेचे समोर, नालासोपारा पूर्व या बिल्डींग वर बसविण्यात आलेला एअरटेल टॉवर येथे 5G नेटवर्कसाठी बसविण्यात आलेले रेडीओ फ्रिक्वेन्सी साठीचे AZNA कार्ड (RR UNIT) हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी कलेची तक्रार पाचोळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(ए),3(5),317(,4) सह टेलिकॉम्युनिकेशन ॲक्ट 2023 चे कलम 42(1) (2)(3)(6),48 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टोळीतील सात आरोपींना अटक, विरार गुन्हे शाखा कक्ष-3 ची कामगिरी

मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल टॉवरची नेटवर्क साठी लावण्यात आलेल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीन चोरीच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. वरिष्ठ पोलीसांनी या घटनेची तपासणी विरार गुन्हे शाखा कक्ष-3 यांच्याकडे वर्ग करण्यात आली तसेच पोलीसांनी घटनास्थळीचे पाहणे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी या टोळीतील सात सदस्यांना अटक केली आहे. टोळीतील काही साथीदार हे उत्तर प्रदेश राज्यातील असून काही मुंबईतील आहे. पोलिसांनी आरोपींकडून 40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी साठी लावण्यात येणारे एकूण 36 मशीन कार्ड (RR UNIT) मोबाईल फोन, पुण्यात वापरलेल्या मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपी एकूण 20 गुन्ह्यात सहभागी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहेत.

1.शुभम बिनयकुमार यादव (24 वय, रा. वाकोला, मुंबई)

2.शैलेश रामअभिलाश यादव (25 वय रा. अंधेरी पूर्व, मुंबई)

3.कपुरचंद्र सुरेश गुप्ता, (25 वय, रा. ॲन्टॉपहील, मुंबई)

4.बन्सीलाल केवलचंद जैन (50 वय रा. राणीबाग, मुंबई )

5.जाकीर मो. सलीम मल्लीक (25 वय रा.दयालपुर, जि. दिल्ली)

6.जैद अन्वर मलीक (19 वय रा. मुस्तफाबाद, पो.स्टे. दयालपुर, जि. दिल्ली यांना मुस्तफाबाद, दिल्ली)

7.मो. जुनैद मो. आरीफ मलिक (24 वय रा. लोणी, जि. गाझियाबाद, राज्य उत्तरप्रदेश ) यास गाझियाबाद, उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेवून गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

चोरीच्या मशीनला आंतरराष्ट्रीय टॅग भारतीय बाजारात पुन्हा विक्री

चोरीचे मशिन हे हॉंगकॉंग व चीन येथे बेकायदेशीर रित्या विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक आरोपी यांचेकडून बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, गोवा इ. राज्यातून चोरी केलेले AZNA कार्ड (RR UNIT) हस्तगत करण्यात आले आहेत. अटक आरोपी यांनी मागील एक वर्षापासून मुंबई, ठाणे, नवी मुंचई, वसई-विरार-नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणात AZNA कार्ड (RR UNIT) ची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. आरोपी हे सध्या पोलीस कोठडी मध्ये आहेत. मशिन / AZNA कार्ड (RR UNIT) हाँगकाँग व चीन येथे पाठवून त्यांचे सॉफ्टवेअर व हार्डवेअर मध्ये बदल करुन पुन्हा काळ्या बाजारात जास्त किंमतीत विक्री केले जात असावेत याबाबत सखोल तपास सुरु आहे.

पोलीस पथक

मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक् (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 तसेच सफी / संतोष चव्हाण, सायबर सेल यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0