Nalasopara Crime News : 28 वर्षापासून फरार असलेल्या सराईत आरोपीला पोलिसांनी केली अटक..
•Nalasopara Crime News मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कामगिरी ; सराईत गुन्हेगाराला अटक, आरोपी 28 वर्षापासून फरार, सन 1996 चे प्रकरण आले बाहेर
नालासोपारा :- सन 1996 मध्ये, बस स्टॉप वरील प्रवाशांचे खिसे मार, पाकीट मार, बॅग चोरी करणे असे विविध आरोप असलेल्या सराईत आरोपीला मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने 28 वर्षानंतर आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात 1996 साली काशिमिरा पोलीस ठाण्यात मिरा गावठाण आणि अमर पॅलेस बस स्टॉप जवळ प्रवास करणारे प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन नकळत त्यांचे हातातील बॅग चोरी करणे, पॅन्टच्या किसे कापून रोख रक्कम चोरी करणे या प्रकारच्या चोरीच्या घटनेच्या विरोधात तीन तक्रारी होत्या. त्याच्या गुन्ह्यातील साथीदार मोहम्मद खालीद मोहम्मद इस्लाम शेख, इजाज गुलाम शेख यांना यापूर्वीच अटक केली होती. परंतु या घटनेतील मुख्य सूत्रधार रमेश ईश्वरलाल सोलंकी हा 1996 पासून फरार होता.
पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी रमेश ईश्वरला सोळंके हा मुंबईच्या मालाड मालवणी येथे वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे,पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी, आसिफ मुल्ला, संग्राम गायकवाड या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे रमेश ईश्वरला सोलंकी (59 वर्ष) याला दहिसर चेक नाका पेंकरपाडा मिरा रोड येथून 24 जून रोजी सायंकाळी 6.00 मोठ्या शिताफीने आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे. पोलीस चौकशीसाठी आरोपीला काशिमीरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
आरोपीच्या विरोधात मुंबई, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, गुजरात रेल्वे पोलिसांच्या सुरत आणि वलसाड या पोलीस ठाण्यात एकूण 09 गुन्हे दाखल आहे.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त (गुन्हे) (अतिरिक्त कार्यभार), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेन्द्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेंन्द्र विचारे, सहाय्यक पोलीस फौजदार श्रीमंत जेधे, संतोष चव्हाण, पोलीस हवालदार संतोष मदने, हनुमंत सुर्यवंशी, अनिल नागरे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, राजविर संधु, प्रविणराज पवार, सतिष जगताप, राजाराम काळे, महेश वेल्हे, संग्राम गायकवाड, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, सतिष जगताप, पोलीस शिपाई अखिल सुतार, नितीन राठोड, साकेत माघाडे, अंगद मुळे, सचिन चौधरी, सर्व नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी फरार असलेल्या आरोपीला 28 वर्षानंतर अटक केली आहे.