Nalasopara Crime News : मारहाण करून जबरदस्तीने चैन स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद
Nalasopara Crime News : 12 गुन्हे वेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद, तीन गुन्हे उघडकीस, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नालासोपारा :- मारहाण करून चैन स्नॅचिंग (जबरी चोरी) Chain Snatching करणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद केली. आरोपींकडून पोलिसांनी एक लाख नऊ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस Vasai Virar Police आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल 12 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून, त्यामधील तीन गुन्हे उघडकिस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,वालीव पोलीस ठाणे हद्दीत 28 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान फिर्यादी हया वसई पूर्व, गॅलेक्सी अपार्टमेंट गेटच्या समोर, गोखीबरे तलाव रोड, वसई पूर्व येथुन रोडने पायी चालत जात असताना दोन अनोळखी व्यक्तींना त्यांचेकडील मोटार सायकल वरुन फिर्यादीचे जवळ येऊन मोटार सायकलच्या पाठीमागे बसलेल्या आरोपीने फिर्यादी यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करुन फिर्यादीस मारहाण करुन फिर्यादीच्या गळयातील 5 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (45 हजार रुपयांची) जबरीने खेचुन चोरी करुन पळून गेले म्हणून वालीव पोलीस ठाणे कलम 309(6), 3(5) भा.दं. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर काही वेळातच अशाच प्रकारे माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीमध्येही गुन्हा घडला असल्याने माणिकपुर पोलीस ठाणे येथे कलम 305(4), 23(5) भारतीय न्याय संहीता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस उप आयुक्त परिमंडळ- 2 मीरा भाईंदर वसई विरार यांनी तात्काळ वालीव व माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते.पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2 यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे दोन्ही गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आरोपी शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केले. पथकांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासावरून व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपी निष्पन्न करुन आरोपी कन्नुभाई ऊर्फ कन्हेया रामाभाई सोलंकी यास मोटार सायकलचा छुपा पाठलाग करुन हिमतनगर, गुजरात राज्यातून ताब्यात घेवुन अटक केली आहे.मुख्य आरोपीना सहकार्य करुन मुद्देमाल विक्री करण्यासाठी सहकार्य करणारा आरोपी मोहम्मद शरीफ फरीद खान यास भांडूप येथून अटक करुन वालीव व माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण शाखेने कौशल्यापूर्ण कामगिरी केली आहे.
पोलीस पथक
पौर्णीमा चौघुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2 वसई,उमेश माने-पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, नवनाथ घोगरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वसई विभाग, वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे (वालीव पोलीस ठाणे), वरीष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव (माणिकपुर पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक गोरखनाथ जैद, पोलीस निरीक्षक बालीजी दहीफले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव बाबर, पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार धनंजय चौधरी, शैलेश पाटील, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, शामेश चंदनशिवे, सतीश गांगुर्डे, पोलीस नाईक बाळु कुटे, पोलीस शिपाई विनायक राऊत, अभिजीत गढरी, सचिन लांडगे, केतन गोडसे, गोविंद लवटे, आनंदा गडदे, प्रविण कांदे व पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ-2 चे पोलीस हवालदार भालचंद्र बागुल, पोलीस शिपाई अमोल बर्डे, मोहन खंडवी यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.