Nalasopara Crime News : तडिपार ‘गांजा राणी’ जाळ्यात! – गुन्हे शाखा कक्ष-3 ची फिल्मी शैलीतील कारवाई

•8 लाखांचा गांजा आणि दोन वर्षांसाठी हद्दपार असलेली आरोपी – एकाच वेळी दोन गुन्हे उजेडात
नालासोपारा | विरार शहरात शुक्रवार सायंकाळी एखाद्या चित्रपटातील दृश्य घडल्याचा प्रत्यय आला, जेव्हा पोलिसांनी एका तडिपार ‘गांजा राणी’ला 20 किलोहून अधिक अंमली पदार्थांसह रंगेहाथ पकडले. 7 जून 25, वेळ सायंकाळच्या सुमारास नालासोपारा येथील लिंक रोड, स्टार अपार्टमेंटजवळ. एक रिक्षा मिरारोडहून नालासोपारा दिशेने भरधाव चालली होती. तिच्याविषयी गुन्हे शाखा कक्ष-3 च्या एपीआय सुहास कांबळे यांना गुप्त बातमी मिळाली होती – “एक महिला उग्रवासाच्या वासासह गांज्याचा मोठा साठा घेऊन निघाली आहे!”
त्यानुसार पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या सूचनेनुसार पोलीस पथक तयार झाले. दोन पंचासह सापळा रचण्यात आला आणि ती संशयित रिक्षा थांबवण्यात आली. तपासणीदरम्यान महिलेची ओळख शारदा ऊर्फ कुडी गोपी बंजारा (वय 43, रा. अल्कापुरी, नालासोपारा पूर्व) अशी झाली.
तिच्या बॅगेची झडती घेतली असता, पोलिसांच्या नजरेसमोर एकदम धक्का बसला – 8 लाख 6 हजार 840 रुपये किंमतीचा तब्बल 20 किलो 171 ग्रॅम गांजा त्या बॅगेतून सापडला!
या थरारात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली – ही महिला महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत पालघर जिल्ह्यातून तडिपार होती! तरीही ती परत परिसरात आली आणि अंमली पदार्थांची तस्करी करत होती.
या दुहेरी गुन्ह्याच्या प्रकरणात, पोलीस शिपाई आतिश पवार यांनी सरकारतर्फे नालासोपारा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा आणि तडिपार आदेशाचे उल्लंघन या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
न्यायालयाने आरोपीस 12 जून 2025 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, पुढील तपास अधिकाधिक गुंतागुंतीचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या थरारात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली – ही महिला महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत पालघर जिल्ह्यातून तडिपार होती! तरीही ती परत परिसरात आली आणि अंमली पदार्थांची तस्करी करत होती.


