क्राईम न्यूजमुंबई

Nalasopara Crime News : कारची काच फोडून बॅग आणि पैसे चोरी करणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद

Nalasopara Crime News : सराईत चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुस्क्या आवळल्या

नालासोपारा :- पेल्हार पोलीस ठाण्याच्या Pelhar Police Station हद्दीत 01 जुलै च्या दरम्यान धानीव बागेतील मारुती सुझुकी शोरूम समोर चालू असलेल्या नवीन इंडस्ट्रियल गाळ्याच्या समोर फिर्यादी यांनी आपली स्कॉर्पिओ गाडी पार्क केली होती. फिर्यादी हे इंडस्ट्रियलचे नवीन बांधकाम चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी गेले असता त्यांच्या सीटवरील ठेवलेले लेदर ची बॅग कोणीतरी अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून चोरी करून नेल्याची तक्रार पेल्हार पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (सी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले होते. Nalasopara Crime News

सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपींचा शोध, नालासोपारा ते वापी पोलिसांनी घेतला तपास

पेल्हार पोलीस ठाण्याच्या Pelhar Police Station हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे वारंवार होत असल्याने त्या अनुषंगाने पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार यांना गुन्हा करणा-या आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले होते. तात्काळ या पथकाने घटनास्थळी चे सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली. तसेच आरोपी रस्त्यावर उभी असलेल्या कार मध्ये ठेवलेली बॅग चाकूच्या साह्याने गाडीचे टायर पंचर करून कारच्या काचा गुल्लर व लोखंडी छऱ्याने तोडून बॅग घेऊन पळून जात असल्याचे पोलिसांना फुटेज मध्ये दिसले. पोलिसांनी घटनास्थळीवर सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच नालासोपारा ते वापी या ठिकाणाचे असंख्य सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून आरोपींचा शोध घेत होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी नालासोपारा येथील सोपारा फाटा येते येणार असल्याची खात्रीदायक माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून गुन्हयाच्यावेळी वापरण्यात आलेले दोन गुल्लर, छरे, लहान चाकू तसेच गुन्ह्यात चोरीला गेलेले रोख रक्कम आणि कागदपत्रे हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण 20 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी मध्ये एक आरोपी हा अल्पवयीन असून त्याला भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. Nalasopara Crime News

चार आरोपींची नावे, एक आरोपी अल्पवयीन

1) कार्तिक बालू नायडु, (23 वर्ष), सध्या रा. गुलाबनगर, वापी गुजरात, मुळ रा. मु.पोस्ट करंजीया, वाकीपाडा, ता. नवापूर, जि. नंदुरबार,
2) रामु पावनआसम तुट्टीनायकर (40 वर्ष), रा. रा. गुलाचनगर, वापी गुजरात, मुळ रा. ग्राम रावतामेळ, तहसिल तुवागुडी, जि. त्रिचनापल्ली, राज्य तमिळनाडु,
3) सुब्रमनी रामु नायडू, (50 वर्ष),
रा. गुलाबनगर, वापी गुजरात, मुळ रा. ग्राम तिमपुर, १३ नंबर, जि. त्रिचनापल्ली, राज्य तमिळनाडु. हे तिन्ही आरोपी परराज्यातून येऊन अशा प्रकारे घटना करत होते.तसेच यातील चौथा आरोपी हा अल्पवयीन असून त्याला भिवंडीच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.आरोपी यांचे विरुध्द मध्यप्रदेश व गुजरात राज्य येथे गुन्हे दाखल आहेत.
आरोपी यांनी काशीमिरा, मिरा-रोड, वसई येथे गुन्हे केले असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे.

पोलीस पथक

जयंत भजबळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे, कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे),शकील शेख, पोलीस निरीक्षक (प्रशासन) पेल्हार पोलीस ठाणे, पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, वाल्मीक पाटील, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अभिजित नेवारे, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. Nalasopara Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0