Nalasopara Crime News : उत्तरप्रदेशमध्ये राहणाऱ्या सराईत गुन्हेगारांना नालासोपारामधुन अटक, वसई-विरार वाहनचोरी
Nalasopara Crime News : सराईत गुन्हेगारांना मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी नालासोपारा परिसरातून अटक केली आहे.
नालासोपारा :- उत्तर प्रदेश मध्ये राहणाऱ्या सध्या विरारच्या कांदर पाडा Virar Kandar Pada येथे राहणार आहे. एका सराईत मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या Vasai Virar Crime Branch प्रकटीकरण विभागाने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीतल्या तीन मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. Nalasopara Latest Crime News
मोटार वाहन चोरीचे गुन्हे वाढत असल्याने मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तांनी मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेला त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत संशयित व्यक्ती चोरीमधील एक मोटरसायकल विक्री करण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालये समोर अलकापूर रिक्षा स्टॅन्ड जवळ, नालासोपारा येथे येणार असल्याची बातमी मिळाली होती. बातमी मिळाल्यानंतर पोलीस हवालदार राजाराम मधुकर काळे, संतोष मदने, हनुमंत सूर्यवंशी, पोलीस शिपाई अपील सुतार, साकेत माघाडे यांनी सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने आपले नाव अरबाजहुरोन अब्दुलसलाम शेख, (वय 19 रा. कांदरपाडा, विरार पूर्व, मूळ रा., उत्तरप्रदेश) असे सांगितले. तसेच, आरोपीने पेल्हार, माणिकपूर, भोईवाडा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहन चोरी केल्याचे कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून तीन मोटरसायकल जप्त केली आहे. Nalasopara Latest Crime News
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, आसीफ मुल्ला, पोलीस हवालदार हनुमंत सुर्यवंशी, राजाराम काळे, संतोष मदने, संग्राम गायकवाड, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, प्रविणराज पवार, महेश वेल्हे, पोलीस शिपाई अखिल सुतार, साकेत माघाडे, नितीन राठोड, अंगद मुळे सर्व नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे. Nalasopara Latest Crime News