Nalasopara Crime News : कॅपिटल मॉल जवळ नालासोपारा येथे पोलिसांची कारवाई, वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
Nalasopara Capital Mall Crime News : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांना यश,अवैध्य वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या एक महीला आरोपीस अटक करुन तीन महीलांची सुटका
नालासोपारा :- आचोळे पोलीस ठाणे हद्दीतील “पंचकर्मा बॉडी केअर शॉप , समर्पण सी एच एस, यशवंत विवा टाउनशिप, कॅपिटल मॉल जवळ नालासोपारा पूर्व याठीकाणी एक महीला वेश्यादलाल ही वेश्याव्यवसाय करण्याकरिता मुली पुरवित असल्याची गोपनीय माहीती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळाल्यावरुन पोलीस पथक, बोगस गिऱ्हाईक व दोन पंच असे सदर ठिकाणी जावुन 27 एप्रिल रोजी कारवाई करुन महीला वेश्यादलाल शबाना ऊर्फ सोनम शफीक शेख चय 28 वर्षे हिला अटक करुन तीन महीला पिडीतांची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षास यश आलेले आहे. Nalasopara Crime News
पोलिसांकडून कारवाई करत वेश्या व्यवसाय केला पर्दाफाश
बोगस गि-हाईक तयार करून त्यास नमुद वेश्यादलाल हीचेकडे मिळालेल्या माहीतीच्या आधारे शबाना ऊर्फ सोनम शफीक शेख हीचे स्पामध्ये जावुन वेश्यागमनासाठी मुलीची मागणी केली असता तीने सांगितले की, मी एका मुलीचे मसाज व वेश्यागमनाचा मोबदला म्हणून 4 हजार रु. घेते. आपणास कबुल असेल तर 4 हजार रु. देवून तुम्ही येवू शकता असे सांगितल्यावर बोगस गि-हाईक याने होकार दिला. त्यानंतर बोगस गि-हाईक हा पंचासह “पंचकर्मा बॉडी केअर शॉप नं.९, समर्पण सी एच एस, यशवंत विवा टाउनशिप, कॅपिटल मॉल जवळ नालासोपारा पूर्व येथे गेले असता वेश्यादलाल शबाना ऊर्फ सोनम हीने बोगस गिऱ्हाईकास तीन महीला दाखवल्या व त्यामधुन तुम्ही पसंद करा व माझे कमिशन व वेश्यागमनाचा मोबदला म्हणून मला ठरल्याप्रमाणे पैसे दया असे सांगितल्यावर बोगस गिन्हाईक याने पोलीस निरीक्षक पवार यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे एक महीला पसंद करुन छापा पंचनाम्यातील ठरल्याप्रमाणे पैसे दिले बोगस गिऱ्हाईक याने पोलीस पथकास कन्फरमेशन इशारा दिला असता दोन पंचासह सदर ठिकाणी जावून छापा टाकला त्यामध्ये एक महीला दलाल आरोपी शबाना ऊर्फ सोनम शफीक शेख हीस ताब्यात घेतले. व तीन महीला पिडीत यांची वेश्याव्यवसाया पासुन सुटका केली आहे. Nalasopara Crime News
यातील वेश्यादलाल नाव शबाना ऊर्फ सोनम शफीक शेख (24 वर्षे) (संयुक्त नगर, अलकाप्री नालासोपारा) मूळ रा. दिल्ली हीने पिडीत महीलांना पैशाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ग्राहकांना बोलावुन त्यांचेकडुन पैसे घेवून पिडीत महीला यांना वेश्याव्यवसाय करण्यास लावते व वेश्यागमनाचा मोबदला व कमीशन मिळून असे एकुण एका महीलेचे 4 हजाररु. घेते व त्यातील काही पैसे पिडीत महीलांना देत असते. Nalasopara Crime News
तरी सदर पिडीत महीला यांची वेश्याव्यवसायाच्या दलदलीतून सुटका करून महीला दलाल आरोपीस अटक करून आचोळे पोलीस ठाणे भादविस कलम 370(1) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे आरोपीत शबाना ऊर्फ सोनम शफीक शेख हीचेवर गुन्हा दाखल केला आहे. Nalasopara Crime News
पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे) Avinash Ambure , सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार सहाय्यक फौजदार गवई, पोलीस हवालदार शेटये, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, महिला पोलीस शिपाई पाटील, पोलीस हवालदार पागी, सर्व नेम.अन.मा.वा. प्र. कक्ष नालासोपारा विभाग यांनी केली आहे. Nalasopara Crime News