Nalasopara Crime News : नालासोपारा एका बांग्लादेशी नागरिकाला अटक!
नैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या नालासोपारा पथकाने अनधिकृत वास्तव्य असलेल्या एका बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. तसेच नालासोपारा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत गुन्हादेखील नोंद करण्यात आला
नालासोपारा :- नालासोपारा शहरात बांग्लादेशी आणि नायजेरियन नागरिकांचे अनधिकृत वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. या नागरिकांचे धरपकड करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. पोलिसांना मिळालेल्या महितीनुसार नालासोपारा पश्चिम येथील साईनिवास टॉवर विनायक कॉम्प्लेक्स तपस्या बिल्डिंग रिक्षा स्टँड जवळ निळेगाव महाराष्ट्र मदिना चिकन शॉप येथे बांग्लादेशी नागरिक वास्तव्य करीत असल्याचे समजले.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या नालासोपारा पथकाचे पोलिस निरीक्षक सौरभी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत एका बांग्लादेशीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता तो बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले आहे तसेच तो भारतात बेकायदा पद्धतीने घुसून वास्तव्य करत असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाणे येथे भारतीय पासपोर्ट अधिनियम 1950 चे कलम 3 (अ), 6 (अ), सह विदेशी अधिनियम 1946 चे कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) बल्लाळ पांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानची वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, पोलीस हवालदार शेटये, शिंदे, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, तिवले, महिला पोलीस शिपाई पाटील, पोलीस हवालदार पागी, सर्व नेम. अने.मा.वा. प्र. कक्ष नालासोपारा यांनी केली.