मुंबई

Nalasopara Crime News : मिरा-भाईंदर वसई विरार सायबर पोलिसांनी‌ दोघा नागरिकांचे मिळून दिले 74 हजार

•नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे पांडे आणि आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या फर्नांडिस यांना फसवणुकीची रक्कम परत मिळून देण्यास, सायबर पोलिसांना आले यश

नालासोपारा :- सायबर पोलिसांनी ऑनलाईन लुटणाऱ्या मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहणाऱ्या दोघांचे पैसे परत मिळवून देण्यास यश आले आहे. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे पांडे यांना फॅशन शो करिता प्रोसेस करण्याचे सांगून ऑनलाइन आर्थिक फसवणुकीची घटना सायबर पोलीस यांच्या NCCRP Portal वर तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या फर्नांडिस यांची हि इन्शुरन्स फसवणूक झाली होती.

मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाला NCCRP Portal या तक्रार दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी संबंधित व्यवहाराचे खात्याचे पडताळणी केली असता पोलिसांनी तक्रारदार यांच्या संशय खात्यावर झालेल्या व्यवहाराची रक्कम गोठविण्यात यश आले. त्यानंतर पत्रव्यवहार करून करून न्यायालयाच्या परवानगीने फसवणूक झालेल्या मूळ खातेदारांच्या खात्यावर 78 हजार 400 रुपये परत मिळू देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे.

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे). मि.मा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हर, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोलकर,‌सहाय्यक फौजदार मिलाग्रिस फर्नाडिस, पोलीस अंमलदार सचिन शेवाळे, पोलीस अंमलदार प्रशांत बोरकर, महिला पोलीस अंमलदार माधुरी धिंडे सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

39 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago