मुंबई
Trending

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री निवासस्थानी अजित डोभाल यांची अचानक भेट! चर्चेला उधाण

Ajit Doval met Devendra Fadnavis: फडणवीस म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे स्वागत करणे गौरवाची बाब”

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांची भेट घेतली. Ajit Doval met Devendra Fadnavis या भेटीची माहिती खुद्द फडणवीस यांनी 11 जून रोजी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून दिली.

मुख्यमंत्र्यांनी लिहिले, “काल संध्याकाळी मुंबईतील माझ्या अधिकृत निवासस्थानी NSA अजित डोभाल यांचे स्वागत करून आनंद झाला. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे स्वागत करण्यात आले.”

अचानक झालेल्या या भेटीमागे कोणते संकेत? चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वीच डोभाल यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. 80 वर्षीय डोभाल यांना हंगामी फ्लू झाल्यामुळे त्यांना रशियात होणाऱ्या बहुपक्षीय सुरक्षा परिषदेचा दौरा रद्द करावा लागला होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्यांना त्या परिषदेच्या शेवटच्या क्षणी आरोग्य कारणामुळे मागे हटावे लागले. मात्र आता मुंबईत त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

फडणवीस आणि डोभाल यांची ही भेट अचानक झाल्याचे म्हटले जात असले तरी, यामागे अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील सुरक्षेच्या संदर्भात रणनीती, गोपनीय सल्लामसलत की केवळ सौजन्य भेट – यावर चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या बैठकीच्या नेमक्या कारणावर दोन्ही बाजूंनी मौन पाळले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0