मुंबई

Nalasopara Crime News : लक्झरी कारची खरेदी-विक्री व कार भाड्याने लावून नफा मिळवून देतो… असे खोटे सांगून लाखोंचा गंडा

Police Bust Car Scam in Nalasopara, Millions of Rupees Involved मौजमजा करण्यासाठी कोट्यावधीची फसवणूक, बँक खाते द्वारे व रोख रक्कम, कार खरेदी विक्री कोट्यावधीची फसवणूक

नालासोपारा :- कार खरेदी विक्रीचा व्यवसाय असून कार भाड्याने देऊन लाखो पैसे मिळवून देण्याचे अमिष दाखवून कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. Businessman in Police Custody for Alleged Car Fraud in Bhayandar त्यांनी हे कृत्य केवळ मौजमजासाठी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.शम्स तबरेज शेरमोहम्मद मन्सुरी मासे विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्याने काशिमिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याच्या तक्रारीवरून आरोपी जयेश कुमार पारसमल मेहता (32 वर्ष) याच्या विरोधात कलम 420,406 प्रमाणे फसवणुकीचे गुन्हे दाखल होते.

कार खरेदी विक्री करुन गहाण ठेवायचं

समरजीतसिंग कर्तारसिंग चड्डा भाईंदर यांना मोटार कार खरेदी विक्रीमध्ये तसेच कार भाड्याने लावून नफा मिळून देतो असे खोटे सांगून त्यांना नफा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून बँक खात्याद्वारे व रोख रक्कम 45 लाख 68 हजार रुपयाचे तसेच साक्षीदार 61 लाख 88 हजार घेऊन फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. Controversial Car Dealer Arrested for Fraudulent Practices तसेच नदीम नूर मोहम्मद पटेल यांची पाच लाख रुपयाची सियाज ही कार आरोपी येणे आपली सासू आजारी असल्याचे सांगून घेऊन गेला परंतु ती कार कोणत्याही प्रकारे परत न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तिन्ही फिर्यादी आणि साक्षीदार यांनी आरोपी जयेश कुमार याच्या विरोधात एक कोटी बारा लाख 56 हजार रुपयांचे फसवणुकीची झाल्याची तक्रार दिली होती.

तो कार गहाण ठेवल्या…

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या जवळील कार हे गहाण ठेवल्याचे पोलिसांचे तपासात निष्पन्न झाले. आणखी दोन कार गहाण ठेवून पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. The Price of Deception: Millions Lost in Luxury Car Scams अशाप्रकारे आरोपींनी लोकांची फसवणूक करून गहाण ठेवलेल्या एकूण दहा कार पोलिसांनी जप्त केल्या असून आरोपीने फिर्यादी व इतर साक्षीदार यांचे एकूण एक कोटी 55 लाख 56 हजार एवढी मोठी रक्कम घेऊन फसवणूक केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. आरोपी हा बीएमडब्ल्यू, मर्सडीज, टाटा, हुंडाई, मारुती या कंपनीच्या दहा कार गहाण ठेवल्या होत्या.

पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-01, मिरारोड, विजयकुमार मराठे, सहायक पोलीस आयुक्त मिरारोड विभाग व राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काशिमीरा पोलीस स्टेशन यांच्या सुचनां व मार्गदर्शनाखाली काशिमिरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश बुहाडे, पोलीस हवालदार संतोष क्षिरसागर यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0