मुंबई

Nalasopara Crime News : नालासोपाऱ्यात अंमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश ; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त!

  • ड्रग्ज माफियांचा जाळा उद्ध्वस्त; मॅफेड्रॉन व रोकड हस्तगत,रात्रीच्या सापळ्यात पोलिसांची कारवाई, तीन आरोपी अटकेत

नालासोपारा | नालासोपाऱ्यातील झपाट्याने वाढणाऱ्या अंमली पदार्थ व्यापारावर पोलिसांनी तडाखेबाज कारवाई करत चक्क 30 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या धडाकेबाज कारवाईत 13.9 लाख रुपयांचे मॅफेड्रॉन आणि 17 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली असून, एकाच टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

रात्रीच्या सापळ्यात पोलिसांची कारवाई, तीन आरोपी अटकेत

ही कारवाई 11 जुलै 2028 रोजी मध्यरात्री, माणिकपूर (वसई) येथील मॅकडॉनल्ड समोर करण्यात आली. गुप्त माहितीवरून अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचत पहिल्या आरोपीकडून 69.5 ग्रॅम मॅफेड्रॉन (किंमत 13.90 लाख ) जप्त केलं. त्याच्यावर NDPS कायदा कलम 8(क), 22(क) अन्वये माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

तपासाचा पुढचा धागा नालासोपाऱ्यात पोहचताच दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं. चौकशीदरम्यान कळ्याच्या घरात लपवून ठेवलेली 17 लाखांची रोकड सापडली. आरोपीने कबूल केलं की, ती रक्कम अंमली पदार्थ विक्रीतून मिळालेली आहे. त्यामुळे तीही जप्त करण्यात आली.

vivek

Recent Posts