Nalasopara Crime News : हुंडाबळी, सावत्र मुलाने आणि पतीने आठ महिन्याच्या गरोदर पत्नीला आणि पोटातील बाळाला ठार मारले
•Nalasopara Crime News पुन्हा एकदा हुंडाबळी, हुंड्यासाठी दररोज करत होता मारहाण, आठ महिन्याच्या गर्भवतीला नवऱ्याने आणि सावत्र मुलाने जीवे ठार मारले
नालासोपारा:- माणुसकीला काळिंबा फासणारी घटना नालासोपाराच्या आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कुटुंबातील सावत्र मुलाने आणि त्याच्या वडिलांनी आठ महिन्याच्या गर्भवती आईला जीवे ठार मारण्याची घटना नोंदवण्यात आली आहे. लग्न करूनही हुंडा दिला नसल्याचा राग मनात धरून पती दररोज आपल्या पत्नीला मारहाण करत होता. जयप्रकाश अमरनाथ दुबे यांचे महिलेसोबत लग्न झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी लग्नामध्ये काही दिले नाही या कारणावरून दररोज आपल्या पत्नीला मारहाण करत होता. 07 एप्रिल 2024 च्या रात्री 08.00 वा. सुमारास जयप्रकाश दुबे यांनी दारू पिऊन आपल्या आठ महिन्याच्या गरोदर पत्नीला मारहाण केले तसेच, त्याचा मुलगा सचिन दुबे यांनी आपल्या सावत्र आईला पकडून तिला जबरदस्तीने कोणतेतरी औषध पिण्यासाठी दिले. त्यामुळे महिलेच्या पोटातील आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची नोंद 20 एप्रिल 2024 रोजी आचोळे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कलम 315,498 (अ),34 गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हुंड्यासाठी गर्भवतीचा मृत्यू, पोटात बाळाचा ही मृत्यू
पोलिसांनी या गुन्ह्यातील पती जयप्रकाश अंबरनाथ दुबे यास स्थानिक पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीनावर मुक्त केले. परंतु आरोपी सचिन जयप्रकाश दुबे हा पोलिसांना मिळून येत नव्हता. फिर्यादी महिला तिच्यावर स्टार हॉस्पिटल नालासोपारा पश्चिम येथे उपचार घेत असताना 02 जुलै रोजी मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी जयप्रकाश अमरनाथ दुबे याचा 11 जुलै रोजी रद्द करण्यात आला होता. तेव्हापासून दोन्ही आरोपी पळून गेल्याचे पोलिसांना दिग्दर्शनाला आले होते.
हुंड्यासाठी पती व तिच्या पोटातील बाळाची हत्या यांसारख्या गंभीर व संवेदनशील घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण यांच्या पथक नियुक्ती केले. पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, पोलीस हवालदार राजाराम काळे, पोलिसा हवालदार शिवाजी पाटील, संग्राम गायकवाड, संतोष मदने, आपली शिपाई अखिल सुतार, साकेत माघाडे, नितीन राठोड असे पथक तयार करून आरोपीला शोधण्याकरिता रवाना केले. चार दिवस अहोरात्र महिन्यात आणि प्रयत्न करून तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी जयप्रकाश अमरनाथ दुबे (40 वर्ष), सचिन जयप्रकाश दुबे (20 वर्ष) या दोन्ही आरोपींना आज 16 जुलै रोजी नालासोपारा यातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपींचा पुण्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने पुढील कारवाई करिता दोन्ही आरोपींना अचोळे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे,सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बेन्द्रे, दत्तात्रय सरक, पोलीस उपनिरीक्षक हितेंन्द्र विचारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, पोलीस हवालदार राजाराम काळे, हनुमंत सुर्यवंशी, संतोष मदने, संग्राम गायकवाड, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, सतिष जगताप, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, राजविर संधु, प्रविणराज पवार, महेश वेल्हे, अनिल नागरे, पोलीस शिपाई अखिल सुतार, नितीन राठोड, साकेत माघाडे, अंगद मुळे, मसुब सचीन चौधरी, सफी. संतोष चव्हाण सर्व नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वी कामगिरी केलेली असून दोन आरोपींना अटक केली आहे.