मुंबई

Nalasopara Crime News : नालासोपारा येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला अटक

•Illegal Bangladeshi Migrants Caught By Mumbai Police : नालासोपाऱ्याच्या गालानगर परिसरात बेकायदेशीरपणे बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती आचोळे पोलीसांना मिळाली होती

नालासोपारा :- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पथकाच्या पोलिसांनी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.नालासोपाऱ्याच्या गालानगर परिसरात बेकायदेशीरपणे बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक पोलिसांच्या पथकाला मिळाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गालानगर भंगार गोळा करणारा एक व्यक्ती हा बांगलादेशी असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, नालासोपारा यांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपी रफिफुल सुलतान मुल्ला, (वय 45, रा पुजा तनिषा बिल्डींग, साडी कंपाउंड, गालानगर, नालासोपारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या विरोधात आचोळे पोलीस ठाण्यात भारतीय पासपोर्ट अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथक पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) भास्कर पुकळे यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, सहाय्यक फौजदार उमेश गवई, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, पोलीस हवालदार महेंद्र शेट्ये,अमित चव्हाण सर्व नेम. अनै. मा.वा. प्रति. कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या केली आहे.

vivek

Recent Posts