Nalasopara Crime News : सराईत गुन्हेगाराच्या टोळीप्रमुखावर “मोक्का” अंतर्गत कारवाई
•संघटीतपणे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत आंतरराज्य टोळीप्रमुखावर मोक्कांतर्गत कारवाई, 34 गंभीर गुन्हे दाखल
नालासोपारा :- मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे या गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलिसांनी सराईत आरोपींच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारला आहे. पोलिसांनी दोन सराईत आरोपींच्या विरोधात “मोक्का”(महाराष्ट्र संघटित गुन्हेगारावर नियंत्रण अधिनियमन-1999) कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुखावर बलात्कार, जबरी चोरी, चोरी, गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न असे उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड,हरियाणा, महाराष्ट्र विविध राज्याच्या पोलीस ठाण्यात एकै34 गुन्हे दाखल आहे.
नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्रेट हायस्कूल जवळ अमेय अपॉइंटमेंट समोरून जाणाऱ्या निविदेता विनोद हेगडे हे आपल्या मुलीबरोबर जात असताना पाठीमागून बाईकवर येणाऱ्या दोन व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून तिथून पळ काढला. घडलेल्या घटनेबाबत महिलेने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात भादवि कलम 394,392,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केली असून ते आरोपी सराईत गुन्हेगार आहे.नालासोपारा पोलिसांनी आरोपींच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन आंतरराज्यीय टोळीप्रमुखाला अटक केली आहे. आशिषकुमार राजकुमार भातु उर्फ होलू उर्फ भदोरिया ( 38 वर्ष), अमित कुमार प्रदीप कुमार भातु (36 वर्ष) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी आशिष कुमार याच्याविरोधात महाराष्ट्रसह इतर राज्यात तब्बल 20 गंभीर गुन्हे दाखल आहे तर आरोपी अमित कुमार याच्या विरोधात उत्तर प्रदेश सह इतर राज्यात 18 गुन्हे दाखल आहे. दोन्ही आरोपींच्या विरोधात एकूण 34 गंभीर गुन्हे दाखल आहे. या अनुषंगाने अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परवानगीने दोन्ही आरोपींच्या विरोध मोक्कांतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमन 1999) कलम 3(1),(11),3(2),3(4) अशी कलमे वाढवून आरोपींना अटक करून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नालासोपारा विभाग विजय लगारे हे करत आहे.
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि.पोलीस आयुक्ताय, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त मि. भा. व. वि. पोलीस आयुक्तालय, मा. जयंत बजबळे पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-3 विरार, विजय लगारे सहाय्यक पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग, मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चंदनकर, पोलीस उप निरीक्षक योगेश मोरे व पथक तसेच गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस निरीक्षक प्रमोद बड़ाख व पथक यांनी उकुष्टरित्या पार पाडली आहे.