Nalasopara Crime News : मध्यवर्ती गुन्हे शाखा यांच्याकडून कारवाई ; 12 वर्षापासून जबरी चोरीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपीला केले अटक
Wanted for 12 Years : Police Finally Get Their Hands on the Mastermind दहशत निर्माण करून दिवसाढवळ्या चोऱ्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बारा वर्षानंतर केली अटक
नालासोपारा :- मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून मोठे कामगिरी करत बारा वर्षे पूर्वी जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने बारा वर्षांपूर्वी म्हणजे 2013 च्या दरम्यान एका कुटुंबाच्या घरात दिवसाढवळ्या प्रवेश करून चोरी केली होती. The Long Chase: Police Finally Catch Fugitive Involved in 12-Year-Old Crime तसेच कुटुंबीयाला मारहाण करून घराचं हि मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती परंतु या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हा 2013 पासून फरार होता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
12 वर्षापासून आरोपी फरार
मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांनी रेकॉर्डवरील मुख्य आणि पाहिजे असलेले फरार आरोपी यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या या सूचनेवरून प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल राख यांनी पथक तयार करून सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक पोलीस हवालदार महेश वेल्वे यांचे एक पथक तयार केले होते. फिर्यादी निरंजन शिवधन पाल (42 वर्ष) या रिक्षा चालकाच्या घरी म्हणजेच साईप्रकाश निवास चाळ नालासोपारा येथे दोन आरोपींनी घरात जबरदस्तीने घुसून घराच्या दारा खिडक्या च्या काचा तोडून दहशत निर्माण करून घरात असलेले रोख रक्कम 30 हजार रुपये आणि एक तोळे वजनाचे सोने हे घेऊन तिथून पसार झाले होते. या घटनेच्या बद्दल फिर्यादी यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रारीवरून एक जानेवारी 2013 रोजी अरुण कालिका प्रसाद सिंह याला अटक केले होते परंतु त्याचा साथीदार आणि मुख्य मुख्य सूत्रधार जयप्रकाश सिंग उर्फ जे पी सिंग हा पोलिसांना गुंगारा देऊन तिथून पळ काढला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बारा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेच्या मुख्य आरोपी सिंग हा वसई रोड येथील बोभोळा गाव येथे येणार होता. पोलिसांनी सापळा रचून पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा एक पथक तयार करून आरोपी जयप्रकाश सिंग याला मोठ्या शितापीने 13 जून रोजी अटक केली. पोलिसांनी कारवाई करिता आरोपीला नालासोपारा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), आणि भास्कर पुकले सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शखाली मध्यवती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेन्द्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, पोलीस हवालदार मनोहर तावरे, महेश वेल्हे, शिवाजी पाटील, गोविंद केन्द्रे, संग्राम गायकवाड, हनुमंत सुर्यवंशी, अनिल नांगरे, संतोष मदने, पोलीस अंमलदार अंगद मुळे, नितीन राठोड, सचिन चौधरी यांनी आरोपीला अटक केली आहे