Nalasopara Crime News : बुलेट, मोटरसायकल आणि मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक
•तुळींज पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी; 4 गुन्हांची उकल करण्यात पोलिसांना यश
नालासोपारा :- बुलेट ,दुचाकी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चार गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तुळींज पोलीस ठाण्यात हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल चोरी संदर्भात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात. बीएनएस कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस शिपाई पोटे यांच्या गुप्त बातमीदारच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचून विरार परिसरातुन आरोपी शिवम सुधीर झा (27 वय रा.सहकारनगर विरार) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीकडे अधिक तपास केला असता तो बुलेट, मोटार सायकल चोरी करण्यामध्ये सराईत असल्याचे दिसुन आले. आरोपी याने गेल्या 15 दिवसांमध्ये विरार परीसरामध्ये दोन मोटर सायकल व नालासोपारा पश्चिम येथे एक मोटर सायकल चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी यास अटक करुन त्याच्याकडुन गुन्हयातील 1 मोबाईल फोन व 3 मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. अटक आरोपी याच्याकडुन तुळींज पोलीस ठाणे येथील 1 गुन्हा, विरार येथील 2 गुन्हे व नालासोपारा पोलीस ठाणे येथील 1 गुन्हा असे एकूण 4 गुन्हे उघडकिस आणले असुन एकुण 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस पथक
पौणिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-2 वसई,उमेश माने-पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, वसई विभाग, शैलेंद्र नगरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे, सुधीर चव्हाण, पोलीस निरिक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार, सहाय्यक फौजदार सुतनासे, पोलीस हवालदार वरठा, मोरे,जाधव, पोलीस शिपाई पोटे, छपरीबन,कदम, राजगे यांच्या पथकाने केलेली आहेच.