Nalasopara Crime News : नालासोपारा येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एका बांगलादेशीला अटक

•अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी बांगलादेशी बेकायदेशीर स्थलांतरित नागरिकाला अटक
नालासोपारा :- भारतात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी कमी होताना दिसत नाही. बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या मोठ्या कारवाईत, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी नालासोपारा परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना मिळालेले गोपनीय बातमीदारामार्फत आचोळे गाव शिवसेना शाखेजवळ, नालासोपारा पूर्व या ठिकाणी बांगलादेशी नागरीक विनापरवाना राहत असल्याची माहिती मिळाली होती.या ठिकाणी सापळा रचून एक पुरुषाला ज्यांचे नाव शमीम मिजानुर मिर्झा (वय 23 रा.श्री समर्थ अपार्टमेंट आचोळे गाव शिवसेना शाखेजवळ, नालासोपारा पुर्व मुळ देश बांग्लादेश) या बांग्लादेशी पुरुषास ताब्यात घेतले. दुभाषीकामार्फत चौकशी केली असता, तो भारतात विनापरवाना राहत असल्याची माहिती मिळाली.त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने तो बांग्लादेशी नागरीक असल्याचे कबुल केले.आचोळे पोलीस ठाण्यात भारतीय पासपोर्ट अधिनियम 1950 चे कलम 3 (अ), 6(अ), सह विदेशी अधिनियम 1946 चे कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, पोलीस हवालदार रोशन किणी, महेंद्र शेटये,अमित चव्हाण, महिला पोलीस हवालदार सुप्रिया तिवले सर्व नेम. अनै.मा.वा. प्रति. कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्टरित्या केली आहे.


