Nalasopara Crime News : 40 लाखांची फसवणूक सायबर पोलिसांनी मिळवून दिले 27 लाख
काशिगाव पोलीस ठाण्याचे दमदार कामगिरी ; शेअर मार्केट ॲप मध्ये गुंतवणूक करून 40 लाखाची फसवणूक, 27 लाख परत मिळून देण्यास यश
नालासोपारा :- शेअर मार्केटमध्ये भरपूर फायदा मिळण्याचे अमिष दाखवून काशिमिरा परिसरात राहणाऱ्या देवेंद्र कृष्णाचंद्र साहु यांची ऑनलाइन 40 लाखांची फसवणूकीच्या रकमेपैकी 27 लाख रुपये काशिगाव पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाने परत मिळवून देण्यास यश आले आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या देवेंद्र कृष्णाचंद्र साहु यांची ऑनलाईन फसवणूक झाली होती. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिक नफ्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून चाळीस लाख रुपये सायबर चोरट्यांनी गुंतवणूक करण्यास सांगितले. या फसवणुकीबाबत साहु यांनी काशिगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि कलम 420,34, सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2008 कलम 66 (डी),66 (सी) प्रमाणे तक्रार दाखल केली होती.
सायबर विभागाने तक्रारीबाबत दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळती झाल्याचे दिसुन आले. पोलिसांनी तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बँकेसोबत पत्रव्यवहार करुन संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर न्यायालयाकडुन तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरीता सायबर पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी पाठपुरावा केला.न्यायालयाच्या आदेशा नंतर साहु यांच्या खात्यात त्यांची फसवणूक झालेल्या 40 लाखांपैकी 27 लाख रुपये परत मिळाले आहेत.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1, मिरा रोड, विजय कुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे.