Nalasopara Pelhar Police Busted Daru Adda : नालासोपारा मधील हरवटेपाडा गावठी दारू अड्ड्यावर छापा; पोलिसांकडून 1.42 लाखांची गावठी दारु,मुद्देमाल जप्त
नालासोपारा :- नालासोपारा हरवटेपाडा परिसरात बेकायदा गावठी दारु अड्ड्यावर पोलिसांनी Nalasopara Police कारवाई केली. या कारवाईत 1 लाख 42 हजारांची गावठी दारू, गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, ताडी, तसेच साहित्य जप्त करण्यात आले. Daru Adda याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा Pelhar Police Staion दाखल करण्यात आला. प्रभाकर भोये (रा. सागपाडा, धानीवबाग, नालासोपारा पुर्व) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नाव आहेत, अशी माहिती मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी दिली आहे. Nalasopara Latest Crime News
हरवटेपाडा परिसरातील सागपाडा, धानीवबाग, नालासोपारा पुर्व गावठी दारू तयार करत होते. गावठी दारू, बेकायदा विक्री करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस हवालदार संतोष मदने, शिवाजी पाटील, हनुमंत सुर्यवंशी, गोवींद केंद्रे, सतीष जगताप, राजाराम काळे, पोलीस अंमलदार अकील सुतार, साकेत माघाडे, नितीन राठोड या पथकाने छापा घालुन यांनी छापा टाकला. या कारवाईत 1 लाख 42 हजार रुपयांची गावठी दारू, दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेले साहित्य जागेवच नष्ट केले. याप्रकरणी पोहवा/शिवाजी रामचंद्र पाटील, मध्यवर्ती गुन्हे प्रकटिकरण कक्ष यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरुन पेल्हार पोलीस ठाणे महाराष्ट्र वारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ब) (क) (ड) (फ) (ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Nalasopara Latest Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) व मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेन्द्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेंन्द्र विचारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, मनोहर ताबरे, आसीफ मुल्ला, पोलीस हवालदार संतोष मदने, शिवाजी पाटील, हनुमंत सुर्यवंशी,अनिल नागरे, पोलीस शिपाई साकेत माघाडे अखिल सुतार, नितीन राठोड, अंगद मुळे, सचीन चौधरी सर्व नेमणूक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे. Nalasopara Latest Crime News