मुंबई

Naigaon News : अडकलेल्या शटल कॉकचा जीवावर बेतला खेळ! नायगावमध्ये विजेचा धक्का लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

•एसीमधून बाहेर पडणाऱ्या विद्युत प्रवाहाकडे दुर्लक्ष

नालासोपारा :- नायगाव पश्चिमेतील बीच कॉम्प्लेक्समध्ये एका बालकाने आपला जीव गमावल्याची हादरवणारी घटना घडली आहे. बॅडमिंटन खेळताना पहिल्या मजल्यावर अडकलेला शटल कॉक काढण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय आकाश संतोष साहू याचा एसीच्या विद्युत प्रवाहामुळे जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आकाश हा सेंट झेविअर हायस्कूलमध्ये दहावीत शिक्षण घेत होता. खेळाच्या ओढीपोटी त्याने शटल काढण्यासाठी वर चढ घेतली, मात्र तिथे सुरु असलेल्या एसीच्या संपर्कात येताच त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. ही दुर्घटना सोसायटीतील सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

या प्रकरणी परिसरातील नागरिकांनी संबंधित फ्लॅटधारकाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. चालू असलेल्या एसीमधून विद्युत प्रवाह बाहेर पडत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असा आरोप आहे. “ही केवळ अपघाताची घटना नाही, तर निष्काळजीपणामुळे गेलेला निष्पाप जीव आहे,” अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago