मुंबई

Naigaon Crime News : नायगावमध्ये ‘चरस चक्र’ उद्ध्वस्त – नेपाळी नागरिकासह साथीदार अटकेत!

•नवकार सिटी परिसरात गोपनीय सापळा; अमली पदार्थ विक्री करणारे दोघे जाळ्यात,37 लाखांचा चरस जप्त; गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची झडप

नालासोपारा :- नेपाळमधून चरसचा साठा आणून महाराष्ट्रात विक्रीचा डाव रचणाऱ्या दोघांना नायगाव पूर्व येथून अटक करण्यात आली आहे. पालघर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई करत सुमारे 37 लाख रुपयांचा चरस व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एक नेपाळी नागरिक असल्याचे उघडकीस आले असून त्याचा साथीदार देखील अटकेत आहे.

गुन्हे शाखेच्या वरिष्ठांच्या आदेशानंतर, पोलीस निरीक्षक राहुल राख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई उभी राहिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयेंद्र आंचवडे यांना मिळालेल्या विश्‍वासार्ह माहितीच्या आधारे दिनांक 14 जुलै 2025 रोजी नायगाव पूर्व, नवकार सिटी फेज-2 येथील ‘ड्रायशान स्टार आर्केड’ परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी दोघांना ताब्यात घेण्यात आले.

अटक केलेले आरोपी

1.प्रकाश श्रीकांत थापा (वय 46), नेपाळमधून स्थलांतरित

2.मोहम्मद वाहीद शमीम शेख (वय 27), नायगावमधील रहिवासी

पंचासमक्ष आरोपींची झडती घेतल्यावर प्रकाश थापा याच्याकडे 911 ग्रॅम चरस सापडला, ज्याची अंदाजे किंमत 36.44 लाख रुपये आहे. मोबाईलसह इतर सामान धरून 36.88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. साथीदार मोहम्मदकडे 15 हजार रुपयांचा मोबाईल आढळला. एकूण 37 लाख 3 हजार 945 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नायगाव पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर आयुक्त दत्तात्रय शिंदे, उप आयुक्त संदिप डोईफोडे, व सहाय्यक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक कुटे, आंबवडे, पोलीस उपनिरीक्षक कोवे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश होता.सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील पठाण, पोलीस हवालदार राजवीर संधू, राजाराम काळे, सतिष जगताप, सुनिल गोमासे, शरद पाटील, अनिल नागरे, अकिल सुतार, पोलीस अंमलदार साकेत माघाडे ही धडक कारवाई ही फक्त सुरुवात असून, आणखी अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांचा फडशा पडण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

vivek

Recent Posts