Nagpur Violence Update : नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 14 आरोपींना अटक, तीन नवीन एफआयआर दाखल, 105 जणांना अटक

•नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी माहिती देताना सांगितले की, दंगलीप्रकरणी शहराच्या विविध भागातून 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नागपूर :- नागपूर शहरात उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी शुक्रवारी (21 मार्च) 14 जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या 105 झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर हिंसाचारप्रकरणी 10 किशोरांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
नागपूर हिंसाचार संदर्भात तीन नवीन एफआयआरही नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या 17 मार्च रोजी नागपुरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळ झाल्याची माहिती समोर आली होती.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनादरम्यान कुराणातील श्लोक असलेली पत्रक जाळण्यात आल्याची अफवा पसरली.
नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल म्हणाले, “दंगलीप्रकरणी शहराच्या विविध भागांतून 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दंगलीप्रकरणी आणखी तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.” शहरातील काही भागांतून संचारबंदी उठवण्याचा निर्णय उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर घेतला जाईल, असे ते म्हणाले.