Nagpur Violence : नागपूर हिंसाचारात जखमी झालेल्या इरफान अन्सारीचा 5 दिवसांनी मृत्यू, रेल्वे स्थानकावर जात असताना हल्ला

Nagpur Violence Latest Update : नागपूर हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या सोमवारी रात्री 11.30 वाजता हिंसाचार सुरू असताना इरफान अन्सारी नावाच्या व्यक्तीवर हल्ला झाला होता, त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नागपूर :- नागपुरातील हिंसाचाराला पाच दिवस उलटूनही एकाचा मृत्यू झाला आहे. Nagpur Violence या हिंसाचारात इरफान अन्सारी नावाचा एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज (22 मार्च) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 38 वर्षीय इरफान अन्सारी हा नवाज नगर भागातील रहिवासी होता.
इरफान अन्सारी यांच्यावर गेल्या सोमवारी रात्री साडेअकरा वाजता हल्ला झाला होता. रेल्वे स्थानकावर जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. घटनेच्या काही वेळातच पोलिसांना इरफान जखमी अवस्थेत आढळला, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 10 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून 105 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी 10 अल्पवयीन आरोपी आहेत. 49 आरोपींना न्यायालयीन कोठडी, 10 आरोपींना बालसुधारगृहात तर 21 आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.