Nagpur Rain Update : अंगणवाडीपासून महाविद्यालयांपर्यंत 9 जुलैला पूर्ण सुट्टी; ऑरेंज व यलो अलर्टचा धोका
नागपूर | नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून, 8 जुलैच्या मध्यरात्री जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 9 जुलै 2025 रोजी सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
हा निर्णय मध्यरात्री 2.30 वाजता घेण्यात आल्यामुळे, अनेक पालक, विद्यार्थी आणि शिक्षक गोंधळात सापडले.काहींना याची माहिती सकाळपर्यंत मिळालीच नाही, त्यामुळे अनेक मुले सकाळी शाळेकडे रवाना झाल्याच्या घटनाही घडल्या.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना आपत्तीजन्य परिस्थितीत अशी सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार आहे.डॉ. विपिन इटनकर हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असून त्यांनीच हा निर्णय अधिकृतरित्या लागू केला आहे.
हा निर्णय रात्री उशिरा घेतल्याने अनेक पालकांना सकाळपर्यंत अधिकृत माहितीच मिळाली नाही.
फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि शाळांच्या वैयक्तिक ग्रुपवरून मिळणाऱ्या अर्धवट माहितीकडे पाहून अनेकांना खात्री वाटत नव्हती.यामुळे काही विद्यार्थ्यांना पावसातच शाळेत जावे लागले, तर काहींनी वाट पाहत घरीच बसणे पसंत केले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…