Nagpur Police : रामनवमीनिमित्त राज्यात सतर्कतेचा इशारा, पोलिसांना या सूचना, मुस्लिमबहुल भागावर विशेष लक्ष

Nagpur Police On Ram Navmi : हिंसाचारानंतर नागपुरातही रामनवमी मिरवणुकीसाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन हजार पोलिस रस्त्यावर तैनात असतील.
नागपूर :- रामनवमनिमित्त पोलीस सतर्क आहेत. Ram Navmi Nagpur राज्यभर पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत. गेल्या वर्षी रामनवमीच्या दिवशी घडलेल्या तणावपूर्ण घटनांमुळे यावेळी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. Nagpur News
तणावाच्या घटना घडलेल्या भागात पोलीस बंदोबस्त वाढवणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून सर्व भागांवर नजर ठेवली जाणार आहे.काही भागात आयोजकांकडून रामनवमीच्या शोभा यात्रेचे मार्ग बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे, त्यामुळे स्थानिक पोलिसांना यात्रेला परवानगी देताना काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.मुस्लीमबहुल भागातून निघणाऱ्या मिरवणुकांवर पोलिसांची विशेष नजर राहणार असून, मशिदीसमोरून मिरवणूक निघताना अधिक खबरदारी घेण्यात येणार आहे.
हिंसाचारानंतर नागपुरातही रामनवमी मिरवणुकीसाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन हजार पोलिस रस्त्यावर तैनात असतील.ही शोभा यात्रा नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरापासून सुरू होऊन हंसपुरी, शहीद चौक, कोतवाली, सुभाष रोड, कॉटन मार्केट, सीताबर्डी मार्गे परत राम मंदिरात पोहोचते.नागपूरच्या या यात्रेला ऐतिहासिक महत्त्व असून आकर्षणाचे केंद्र आहे, त्यामुळेच ही यात्रा पाहण्यासाठी शेकडो लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात.