मुंबईठाणेनागपूर
Trending

Nagpur News : महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवणार! – मुख्यमंत्री-भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची घोषणा

Nagpur Latest News : “राष्ट्रवादीला दूर ठेवण्याचा प्रश्नच नाही; स्थानिक पातळीवर चर्चा सुरू,” कामाच्या आणि विकासाच्या अजेंड्यावर लढणार असल्याचे स्पष्टीकरण

नागपूर :- आगामी महापालिका निवडणुकांच्या (Maharashtra Municipal Elections) पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला.

महायुतीचा एकत्रित लढा

“तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रविंद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत आमची बैठक झाली होती. त्या बैठकीत येणाऱ्या महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. काल (गुरुवारी) देखील रविंद्र चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याच निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.शिंदे यांनी सांगितले की, “स्थानिक पातळीवर पदाधिकारी परस्परांसोबत चर्चा करतील. जिथे कुठे अडचण येईल, तिथे वरिष्ठ नेते हस्तक्षेप करून ती अडचण दूर करतील.”

राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणार?

राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) महापालिका निवडणुकीतून दूर ठेवणार का, या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट उत्तर दिले. “कोणाला बाजूला ठेवण्याचा विषय नाही. आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढणार आहोत. स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. महायुती मजबुतीने निवडणूक लढेल.”

विकास आणि कामाच्या आधारावर

निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर लढणार, हे स्पष्ट करताना शिंदे म्हणाले, “मागच्या साडेतीन वर्षातील अनेक लोकाभिमुख कल्याणाकारी योजना महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहेत. कामाच्या आधारावर आणि विकासाच्या अजेंड्यावर आम्ही निवडणुका लढवणार आहोत.” त्यांनी महायुती सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक आणि सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या निर्णयांचा उल्लेख केला.

बंडखोरीवर उपाय

महायुती म्हणून निवडणूक लढवताना बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही, यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी समाधान योजना सांगितली. “महायुतीमध्ये इच्छुक अनेक आहेत. ज्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांच्यासाठी इतर व्यवस्था आहे. तालुका कमिट्या, जिल्हा कमिट्या, स्थानिक पातळ्यावरील कमिट्या यामध्ये इच्छुकांना सामावून घेतलं जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0