महाराष्ट्रनागपूर
Trending

Nagpur News : आज शुक्रवारचा नमाज, नागपुरात मशिदीबाहेर कडक बंदोबस्त

Nagpur Breaking News : या दंगलीप्रकरणी आतापर्यंत 12 एफआयआर नोंदवण्यात आले असून त्यापैकी 4 सायबर पोलिसांनी तर 8 गुन्हे स्थानिक नागपूर पोलिसांनी नोंदवले आहेत. तसेच हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 100 जणांना अटक करण्यात आली आहे.

नागपूर :- नागपुरात सोमवारी (17 मार्च) झालेल्या हिंसाचारानंतर शहरातील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. गुरुवारी अनेक भागात संचारबंदी शिथिल करण्यात आली. मात्र, आता शुक्रवारी (21 मार्च) होणाऱ्या रमजानच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. Security has been added up outside mosques in Nagpur due to Friday prayers.

वास्तविक, पवित्र रमजान महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारची नमाज शुक्रवारी अदा केली जाणार आहे. या संदर्भात पोलीस Nagpur Police On High Alert हाय अलर्टवर आहेत. शहरातील सर्व मशिदींबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांकडून कडक नजर ठेवण्यात येत आहे.

या दंगलीप्रकरणी आतापर्यंत 12 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, त्यापैकी चार सायबर पोलिसांनी तर 8 स्थानिक नागपूर पोलिसांनी नोंदवले आहेत. तसेच हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 100 जणांना अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0