• चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अचानक तपासणीत ड्रॉवरमध्ये आढळले होते रोख 5 हजार रुपये ; भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर थेट कारवाई ; सह दुय्यम निबंधक अ. तु. कपाले निलंबित
नागपूर :- जागा खरेदी-विक्री कार्यालयात नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट नागपूरच्या खामला येथील दुय्यम निबंधक कार्यालयावर धाड टाकून तेथील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता. या धाडसत्राच्या दोन दिवसानंतर, महसूलमंत्र्यांनी थेट कारवाईचा बडगा उगारत तेथील सह दुय्यम निबंधकाचे निलंबन केले आहे. याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे.
धाडीत सापडली होती रोख रक्कम
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी अचानक खामला येथील दुय्यम निबंधक कार्यालयात धाड टाकत कार्यालयाची झाडाझडती घेतली. यावेळी एका अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये रोख 5 हजार रुपये सापडले होते. नोंदणी व मुद्रांक कार्यालयात सातत्याने भ्रष्टाचार होत असून नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार बावनकुळे यांच्याकडे आली होती.
‘हा सगळा भ्रष्टाचार अवघ्या महाराष्ट्राने पाहिला’
बावनकुळे यांनी धाड टाकली, तेव्हा त्यांच्यासोबत पत्रकार आणि कॅमेरेही असल्याने हा सगळा भ्रष्टाचार अवघ्या महाराष्ट्राने पाहिला गेला. येथील कार्यालयाच्या गैरप्रकाराबाबतच्या अनेक तक्रारी आल्याने आपण इथं आलो, अशी प्रतिक्रिया त्यावेळी बावनकुळे यांनी दिली होती. त्यानंतर, त्यांनी सापडलेले पैसे जप्त करून पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते.
सह दुय्यम निबंधकाचे निलंबन
या संपूर्ण घटनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून निलंबन आदेश जारी करण्यात आला असून, सह दुय्यम निबंधक अ. तु. कपाले यांना निलंबित करण्यात आले आहे. महसूलमंत्र्यांनी अचानक दिलेल्या भेटीत रोख रक्कम सापडल्याने खळबळ उडाली होती. आता बावनकुळे यांच्या आदेशान्वये या अधिकाऱ्यावर कठोर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…