नागपूर

Nagpur News : नागपूर पाण्याखाली! स्मशानभूमीत बोटीनं बचाव, 11 रस्ते बंद, जनजीवन विस्कळीत

Nagpur Rain Update ; नरसाळा स्मशानभूमीजवळ खोलगट भागात पाण्याचा साठा; नागरिकांना बोटीतून बाहेर काढलं

नागपूर | उपराजधानी नागपूरमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसाने शहराला अक्षरश: वेढा घातला आहे. नरसाळा परिसरातील स्मशानभूमीजवळ खोलगट भागात पाण्याचा मोठा साठा झाल्यामुळे अग्निशमन दलाला बोटीद्वारे बचावकार्य करावं लागलं.नरसाळा परिसरात नाल्यांना पूर आल्याने पाणी वेगाने खोलगट वस्तीत शिरलं. येथे अडकलेल्या नागरिकांची माहिती मिळताच अग्निशमन दल तत्काळ बोटी घेऊन दाखल झालं आणि नागरिकांची सुटका करण्यात आली. Nagpur Rain Update

सक्करदरा, सोमवारी पेठ, मंगलदिप नगर, कळमना, दत्तात्रय नगर परिसरात अनेक घरात पाणी शिरले. गटारे तुंबल्याने घरांमध्ये गाळयुक्त पाणी शिरल्याचं निदर्शनास आलं.
अग्निशमन दलाच्या पथकांनी पाणी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे. रस्ते तलावात रूपांतरित झाल्यामुळे शाळकरी मुलं, वृद्ध नागरिक अडकले.

शहरातील प्रमुख रस्ते – गिट्टीखदान, शंकर नगर, मेडिकल चौक ते हिंगणा रोडपर्यंत – सर्वत्र जलतलाव तयार झाले आहेत.
वाहने रेंगाळत चालत असून, बाजारपेठांमध्येही गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे.नागरिक खरेदीसाठी बाहेर पडण्यास धजावत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत.

डॉ. विपीन इटनकर (जिल्हाधिकारी) यांनी हवामान खात्याच्या सतर्कतेनंतर 9 जुलै रोजी सर्व सरकारी व खासगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
पुढील काही दिवसांत पावसाची स्थिती गंभीर राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ग्रामीण भागातही वाहतूक ठप्प – 11 मार्ग बंद

सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
मौदा, रामटेक, कन्हान, कुही या भागांतील नद्या-नाले धोक्याच्या पातळीवर आहेत. त्यामुळे खालील रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे:

मौदा: तारसा–जोड, मालोडी–नवंगाव

रामटेक: चौदान डोंगरी, बनपूरी–नगरधन

कन्हान: पेडी–अजनी

कुही: मुसळगाव, चितापूर–भानेवाडा

इतर: चौगान–मुसेवाडी, नालादेवी–किरणापूर, मांदगली–धामणगाव

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago