नागपूर
Trending

Nagpur News : नागपूरच्या दाट वस्तीत बिबट्याचा धुमाकूळ!

Nagpur latest news : चार जणांना जखमी केल्यानंतर वनविभागाचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन; गुंगीच्या अवस्थेतही बिबट्याने मारली 15 फुटांची उंच उडी!

नागपूर :- नागपूरच्या शिवनगर परिसरात दाट लोकवस्तीमध्ये एका बिबट्याने मोठी खळबळ उडवून दिली होती. सकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान या बिबट्याने परिसरातील चार जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. यानंतर, घरात लपून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांनी संयुक्त रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.

बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंदुकीतून त्याच्या शरीरावर दोन डार्ट मारले. हे डार्ट लागल्यानंतर गुंगीचे औषध बिबट्याच्या शरीरात भिनायला सुरुवात झाली, तरीही बिबट्याने हार मानली नाही. त्याने आपली पूर्ण ताकद लावत दुसऱ्या गच्चीवर जाण्यासाठी तब्बल 15 फूट उंच उडी मारली.

मात्र, गुंगीमुळे त्याला नीट पाहता आले नाही आणि शरीरातील औषधाचा परिणाम वाढल्यामुळे तो दुसऱ्या गच्चीवर चढू शकला नाही. अखेर हा बिबट्या उंचावरून खाली कोसळला. तो खाली पडल्यानंतर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला सुरक्षितपणे उचलले. उंचीवरून पडल्यामुळे त्याला दुखापत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमल्यामुळे आणि सातत्याने आवाजामुळे बचाव कार्यात काही अडचणी आल्याचे वनविभागाने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0