क्राईम न्यूज

Nagpur Job Fraud News : नोकरीच्या आमिषाने लग्न, फसवणूक आणि छळ! – नागपुरात महिला कबड्डीपटू किरण दाढे यांची विष प्राशन करून आत्महत्या

Nagpur Latest Job Fraud News : “आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी दिला होता होकार, पण फसवणूक झाली.” – पतीने मानसिक आणि लैंगिक छळ केल्याचा कुटुंबाचा आरोप; आरोपी पतीवर गुन्हा दाखल

नागपूर :- उपराजधानी नागपूरजवळील सावनेर तालुक्यातील माळेगाव टाऊन येथे एका महिला कबड्डीपटूने नोकरीच्या आमिषाने लग्न करून फसवणूक झाल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरण दाढे (वय अंदाजे 25-30) या महिला कबड्डीपटूने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले. Nagpur Latest Fraud News

नोकरीचे आमिष दाखवून लग्न

किरण दाढे यांचा विवाह 2020 मध्ये स्वप्नील जयदेव लांबघरे याच्याशी झाला होता. लग्नापूर्वी स्वप्नीलने किरण आणि तिच्या भावाला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी नोकरीचा फायदा होईल या आशेने किरण यांनी लग्नाला सहमती दिली होती. मात्र, लग्नानंतर काही काळानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे किरण यांच्या लक्षात आले.

मानसिक आणि शारीरिक छळ

लग्नानंतर स्वप्नील नोकरी देण्यास टाळाटाळ करत होता. याशिवाय त्याने किरणचा मानसिक आणि लैंगिक छळ करण्यास सुरुवात केली.या त्रासाला कंटाळून किरण त्यांच्या पालकांच्या घरी राहायला आल्या. यानंतरही स्वप्नीलने त्यांना धमक्या देणे आणि शिवीगाळ करणे सुरूच ठेवले.स्वप्नीलने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. फसवणूक आणि सातत्याने येणाऱ्या दबावामुळे किरण नैराश्यात गेल्या होत्या.

आत्महत्या आणि गुन्हा दाखल

या सर्व मानसिक त्रासाला कंटाळून किरण यांनी कीटकनाशक औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
किरणच्या माहेरच्यांनी पती स्वप्नील लांबघरे याच्यावर नोकरी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन लग्न केल्याचा आणि मानसिक त्रासाला कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

vivek

Recent Posts