मुंबई

Mumbai Crime News : मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई!

अमेरिकन नागरिकांना गंडवणारे बोगस कॉलसेंटर उद्ध्वस्त – १३ जण जेरबंद

मुंबई | मुंबई गुन्हे शाखा, कक्ष-१२ यांनी गोरेगाव (पूर्व) येथील “विहान कमर्शिअल कॉम्प्लेक्स” मधील बोगस कॉलसेंटरवर धाड टाकून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला.

कॉलसेंटरचा धंदा कसा चालायचा?
सदर कॉलसेंटरमधून अमेरिकन नागरिकांना “Greeksquad” व “Mac cafee” अँटीव्हायरस रिन्युअलसाठी मेल पाठवले जात. मेलमधील टोल-फ्री नंबरवर संपर्क साधणाऱ्या ग्राहकांना फसवून २५० ते ५०० डॉलर्स किमतीची Gift Cards खरेदी करायला लावली जात आणि त्यातून मिळालेली रक्कम क्रिप्टो करन्सीत कन्व्हर्ट करून लाटली जात असे.

कारवाईत जप्ती

१५ संगणक

१० लॅपटॉप

२० मोबाईल

तसेच इतर साहित्य

अटक केलेले

०२ कॉलसेंटर चालक/मालक

०१ मॅनेजर

१० टेलिकॉलर एजंट
= एकूण १३ आरोपी जेरबंद!

सदर आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा व टेलिकम्युनिकेशन अॅक्ट २०२३ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपास कक्ष-१२ करीत आहे.

कारवाईचे मार्गदर्शन
मा. पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त लखमी गौतम, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उप आयुक्त विशाल ठाकूर, तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन गवस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईमुळे पुन्हा एकदा मुंबई गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय स्तरावर नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉलसेंटरच्या रॅकेटला चाप बसवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0