नेत्यांच्या गोंधळलेल्या चेहऱ्यावर “नकली” हसू…. भाजपाचे आमदाराचे शेलार यांची टीका
Ashish Shelar Target MVA Member : भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर खोचक टीका केली.
मुंबई :- महाविकास आघाडीचे MVA मुंबईच्या शिवालयात संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे Uddhav Thackeray , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar , काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते तसेच नाना पटोले Nana Patole या बैठकीला उपस्थित होते महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी या पत्रकार परिषदेत उपस्थित असून आगामी लोकसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे 21 जागांवर काँग्रेस 17 जागांवर तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 10 जागांवर निवडणूक लढणार आहे. या पत्रकार परिषदेनंतर आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी
यांच्यावर टीका केली त्यांनी आपल्या ट्विट करून त्यांना टीका केली आहे.
भाजपाचे आमदार शेलार यांची टीका
नेत्यांच्या गोंधळलेल्या चेहऱ्यांवर “नकली” हसू.. त्यावर
विश्वविख्यात प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून ‘हास्याची चादर” टाकण्याची केविलवाणी धडपड… यादी वाचताना विश्वविख्यातांनी केलेली गडबड…
पत्रकार परिषदेला कुठलेही निवेदन देण्यासाठी कोणीही तयार होईना… मग पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हणून बोलणारे नेते… अशी ही..
महाआघाडीची “शोभा” करणारी “यात्रा” आज गुढीपाडव्याला महाराष्ट्राने पाहिली!!
तुकडे-तुकडे गँग आणि मुस्लिम लिगची छाप असलेल्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे श्रीमान उध्दव ठाकरे यांच्याकडून कौतुक!
लढाई स्पष्ट…
तुकडे तुकडे गँग विरोधात लढू आम्ही देश भक्त !!