क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

भायखळ्यात अनोळखी इसमाचा खून; एक आरोपी अटकेत, इतर आरोपी फरार

मुंबई, दि. 28 ऑगस्ट : भायखळा परिसरात एका अनोळखी इसमाचा खून करून त्याचा मृतदेह ड्रेनेज गटारात टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. Mumbai Buyculla Murder News या प्रकरणी भायखळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. Mumbai Latest Crime News

दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपासून ते दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.०५ वाजेपर्यंतच्या कालावधीत, अज्ञात इसमाने (वय अंदाजे ३२ ते ३५ वर्षे) एका व्यक्तीच्या डोक्यात मारहाण करून त्याचा खून केला. मृतदेह सुर्यकुंड महापुरुष सोसायटी (एफ विंग) च्या पाठीमागील ड्रेनेज गटारामध्ये लपवून पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेबाबत पो.ह.क्र. १०९७ मानसिंग जयसिंग धिवर यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भायखळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६५६/२५ कलम १०३(१), २३८ भा.न्या.सं. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींची माहिती मिळवली. या अनुषंगाने तयार केलेल्या पथकांनी कारवाई करत मृत्युंजय कामेश्वर झा (३६ वर्षे) यास दि. २७ ऑगस्ट रोजी अटक केली.

प्राथमिक चौकशीत उघड झाले की, पाहिजे आरोपी गिरधारी कुमार राय (२२ वर्षे) व इतर दोन आरोपी यांचा मयत इसम केशव चौधरी (झा) (३५ वर्षे) याच्यासोबत गावाकडील जमिनीच्या वादावरून भांडण झाले. त्यातूनच या आरोपींनी दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री त्याचा खून करून मृतदेह ड्रेनेज लाईनमध्ये टाकल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत असला तरी उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून, पुढील तपास भायखळा पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0