ठाणेक्राईम न्यूज

Murder News : जमिनीच्या वादातून खून, दोघेही एकमेकांच्या जीवावर उठले होते

Murder News : मानपाडा पोलिसांची कारवाई ; 36 तासात आरोपीचा शोध, जमिनीच्या भांडणातून जीवे ठार मारले

डोंबिवली :- जमिनीच्या वादातून जीवे ठार मारण्याची घटना मानपाडा पोलीस ठाण्याच्या Manpada Police Station हद्दीत घडली आहे. जमिनीचा वाद विकोपाला जाऊन एकमेकांच्या जिवावर उठलेले दोन्ही एकमेकांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार असल्याचा संशय बाळगत जीवेठार Attempt Murder News मारण्याची घटना घडल्याचे समोर आली आहे. संजय सखाराम भोईर (43 वर्ष) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला आहे. असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे दिसून आले. घटनेच्या गांभीर्य लक्षात घेताच हत्या करणारे अज्ञात आरोपी यांचा शोध घेणे करीता दत्तात्रय शिंदे , अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, सचिन गुंजाळ ,पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3. कल्याण व सुनिल कुराडे , सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांनी घटनास्थळाचे आसपासचे परिसरातील सी सी टिव्ही फुटेज आधारे, तसेच तांत्रिक विश्लेषण आधारे तात्काळ शोध घेणे बाबत मार्गदर्शन करून सुचना दिलेल्या होत्या. Dombivli Attempt Murder News

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक

मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, यांनी पोलीस ठाण्याचे सदर गुन्हयाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, व गुन्हेप्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करून आरोपी यांचा तांत्रिक विश्लेषना आधारे तपास करून तसेच बातमीदाराच्या मार्फतीने गुन्हयातील अज्ञात आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.आरोपी विकास श्याम पाटील, (38 वर्ष), रिक्षा चालक ( रा स्वःताचे घर हिस्सा नं १७४ लक्ष्मी किराणा स्टोअर्स जवळ उंबार्ली रोड डोंबिवली पुर्व,) यांस ताब्यात घेवून त्याचे कडे मानपाडा पो.स्टे. भा.दं. वि. कलम 302,34 प्रमाणे. दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Dombivli Attempt Murder News

जमिनीचा वाद विकोपाला

जुना जामिनीचे वादातुन अटक आरोपीचा काटा काढणार असल्याचा आरोपी संशय होता.त्याचा मनात राग धरून यातील मयत याला आरोपी विकास पाटील त्याच्या साथीदाराने अंधाराचा फायदा घेवुन व संजय भोईर यांना ऐकांतात गाठुन धारदार शस्त्राने साहयाने जिवे ठार मारण्यात आरोपीने कबुली केली आहे.आरोपीच्या साथीदार याचा शोध घेणे चालु असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड हे करत आहे. Dombivli Attempt Murder News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0