ठाणेमुंबई
Trending

नगरपरिषद निवडणुकीला गती! – सकाळच्या सत्रात सोलापुरात उत्साहाचे वातावरण; आमदार बांगर यांच्याकडून मतदानाची गोपनीयता भंग

Maharashtra Election News : दर्यापुरात ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ; बुलढाण्यात बोगस मतदाराला पकडून चोप; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

मुंबई/सोलापूर :- राज्यातील बहुप्रतिक्षित नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली असून, सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी मतदारांनी उत्साह दाखवला आहे. मात्र, काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडणे, गोंधळ आणि गोपनीयतेचा भंग अशा घटना समोर आल्या आहेत.

मतदान टक्केवारी (सकाळी 7.30 ते 9.30)

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा नगरपरिषदेत सकाळी साडे नऊपर्यंत 8.46 टक्के मतदान झाले, ज्यात पुरुषांची संख्या 1129 तर महिलांची 744 होती. सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही उत्साह दिसून आला: अक्कलकोट – 8.16%, मोहोळ – 9.32% आणि दूधनीमध्ये सर्वाधिक 13.13% मतदान झाले.
गोंधळ आणि वादाचे केंद्र

अमरावती (दर्यापूर): नगरपालिका हद्दीमधील शहीद अब्दुल हमीद उर्दू उच्च प्राथमिक शाळा केंद्रातील खोली क्रमांक 1 मध्ये ईव्हीएम मशीन गेल्या एक तासापासून बंद पडल्याने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश पाहायला मिळत आहे. निवडणूक विभाग मशीन दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

बुलढाणा: शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावर बोगस मतदान करताना एका युवकाला मतदान प्रतिनिधींनी पकडले. त्याला चोप देऊन पळवून लावल्याने केंद्रावर मोठा गोंधळ उडाला.

हिंगोली (गोपनीयतेचा भंग): कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करण्यात आला. त्यांनी मतदान केंद्रात “सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढो” अशा घोषणा दिल्या, तसेच ईव्हीएमचे बटण दाबताना एका महिलेला सूचना केल्या.

जामखेड: आमदार रोहित पवार यांनी जामखेडमध्ये दहशतीचे वातावरण असल्याचा आरोप केला आहे. भाजपने गुंडाच्या घरात उमेदवारी दिल्याचे सांगत त्यांनी भाजप आणि शिवसेनेकडून पैसे वाटल्याचाही आरोप केला आहे.

अन्य महत्त्वाच्या घडामोडी

धुळे जिल्ह्यातील दोन नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वाखाली 550 महिला पुरुष पोलीस, 400 होमगार्ड आणि एसआरपीएफची एक कंपनी असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षांसह 43 नगरसेवकांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. उर्वरित 6 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0